ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वर्धा सोशल फोरमचा आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांसाठी बी-बियाणे वाटप व सावित्रीबाई फुले गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न

प्रशासनाची शेतकरी सहायक धोरणे समाज आणि परिवाराच्या पाठिंबा शेतकरी आत्महत्या कमी करू शकतात - पद्मश्री शंकरबाबा पापडकर 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा :_ प्रशासनाची शेतकरी सहायक धोरणे समाज आणि परिवाराच्या पाठिंबा हे शेतकरी आत्महत्या रोखू शकतात असे प्रतिपादन पद्मश्री शंकरबाबा पापडकर यांनी केले ते काल वर्धा सोशल फोरमच्या वतीने आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना निशुल्क बी-बियाणे वाटप तसेच क्रांतिज्योती सावित्रीआई फुले गौरव पुरस्कार सोहळा २०२६ या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.

या वेळी त्यांनी शेतकऱ्यांनी जोड धंदा म्हणून गोपालन आणि बकरी पालन करावे असे सांगितले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. ज्ञानदा फणसे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत विभाग, जिल्हा परिषद, वर्धा या होत्या. त्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले व पुरस्कार प्राप्त महिलांचे अभिनंदन केले. प्रमुख अतिथी म्हणून वैशाली शिंदे मॅडम, उपविभागीय कृषी अधिकारी, जिल्हा कृषी विभाग, यांनी या वेळी उपस्थितांना घन कपाशी लागवडची तसेच या वर्षी पेरणीकरण्याची घाई करू नये असा सल्ला दिला. त्यांनी उपस्थित शेतकरी बांधवांना शेतीविषयक मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर वर्धा सोशल फोरमचे अध्यक्ष डॉ. अभ्युदय मेघे आणि सचिव अविनाश सातव उपस्थित होते.

या कार्यक्रमात आदरणीय पद्मश्री शंकरबाबा पापडकर यांचा भव्य सत्कार करण्यात आला.  सौ.मनीषाताई मेघे यांनी मानपत्राचे वाचन केले.

पद्मश्री शंकरबाबा पापळकर यांच्या अनाथालयातील अंध विद्यार्थिनी कु. गांधारी हिने आपल्या सुरेल आवाजात गीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली. तिचा यावेळी विशेष सत्कारही करण्यात आला.

सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या चार महिलांचा क्रांतिज्योती सावित्रीआई फुले गौरव पुरस्कार २०२६ देऊन सन्मान करण्यात आला. पुरस्कारप्राप्त महिलांमध्ये डॉ. चेतना सवाई, श्रीमती तबस्सुम आझमी, कु. कांचन रघटाटे आणि सौ. अश्विनी रवी काळे यांचा समावेश होता.

वर्धा सोशल फोरमकडून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांसाठी राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाचे हे अकरावे वर्ष आहे. यावेळी रवीभाऊ शेंडे, श्री. शैलेंद्रजी तप्तरी, श्री. चंदूभाऊ ठक्कर, श्री. सुनीलजी तापडिया तसेच महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या सहकार्याने आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना निशुल्क बी-बियाणे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. आसिफजी जाहिद, श्री. सौरभजी ढोमणे, श्री. ब्रिजकिशोरजी पंड्या, श्री. राहुलजी अवथनकर, श्री. प्रदीपजी बजाज, श्री. संजयजी मानमोडे, श्री. दिलीपजी कठाने, श्री. महेशजी गुल्हाने, श्री. श्रीकांतजी राठी, श्री. चंद्रशेखरजी राठी, श्री. श्रीकांतजी काशीकर, श्री. श्यामभाऊ परसोडकर, श्री. रवींद्रजी टप्पे, श्री. पुरुषोत्तमराव खासबागे, श्री. चेतन काळे कन्हैया छगानी सुधाकर मेहरे मनीष टेलरंधे हरीश जोतवानी राजेश बालसरफ डॉ जयंत मकरंदे तसेच शिव प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांनी विशेष सहकार्य केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. पल्लवी पुरोहित यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. श्यामभाऊ परसोडकर यांनी केले. या कार्यक्रमास जिल्हाभरातील सामाजिक कार्यकर्ते, प्रतिष्ठित नागरिक, व्यापारी, शेतकरी बांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये