ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

“श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची पंढरपूर पायदळ पालखी वारी सोहळा”

चांदा ब्लास्ट

सकल तेली स‌माज महासंघ चंद्रपूर द्वारा श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची पायदळ पालखी वारी सोहळा व सत्कार सोहळा दि १२ जून २०२६ ला सकाळी ११.३० वाजता आयोजित करण्यात आला.

या कार्यक्रमाचे उद्‌घाटक म्हणून महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री मा. श्री देवेंद्रजी फडणवीस तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे म्हणून मा. महसूल मंत्री श्री. चंद्र‌शेखरजी बावनकुळे तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बल्लारपूर क्षेत्राचे लोकप्रिय आमदार माजी वित्त, नियोजन व वनमंत्री श्री डॉ. सुधीरभाऊ मुनगंटीवार तर कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितीत मान. आमदार विजयभाऊ वडेट्टीवार माजी विरोधी पक्षनेते, पद‌वीधर मतदार संघाचे लोकप्रिय आमदार, विधान परिषद सदस्य अँड अभिजितजी वंजारी, चंद्रपूर शहराचे लोकप्रिय आमदार मा. श्री किशोरभाऊ जोरगेवार, विदर्भ तेली समाज महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रा.डॉ. संजय बेले, आयोजक सकल तेली समाज महासंघाचे श्री राजेश वारलूजी बेले उपस्थित होते.

श्री संताजी जगनाडे महाराज यांची पायदळ पालखी वारी चंद्रपूर ते शिवपुर (अल्लीपुर) पंढरपूर असा ४२ दिवसाचा प्रवास करून श्री विठ्ठलाचे दर्शन घेवून परत येणार आहे.  आषाढी एकादशी श्री विठ्ठलाचे दर्शनासाठी  गेलेले वारकरी सर्व जनतेला सुख, समृध्दी व शांती आणि समाधान मिळावे यासाठी आराधना करतात.

 आजच्या प्रेस सभेस राजेश बेले, डॉ.संजय बेले,रवि लोणकर, आकाश साखरकर, सोहम बुटले, चंदाताई ईटनकर, कोकीबाताई पोटदुखे, रोहन घोंगळे, दादाजी अगडे मुक्ताई लोखंडे सुनंदा येनुरकर, कवीता वैरागडे,वर्धन चवरे,कल्पना ताई गिरडकर, चंदाताई ईटनकर, योगितालाई पोटदुखे,सुवर्णाताई लोखंडे,सौ. कुमुदलाई खनके, वैशालीताई गिरडकर,अनिताताई वैरागडे,अनिताताई हजारे, ज्योती येनुरकर, शुभांगी चवरे, हेमलता चवरे, विधा चवरे, रमेश खनके गणेश येरणे व समाजातील प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये