ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

लोणीच्या स्वामिनी थेरे यांनी केली एमबीबीएस परीक्षा उत्तीर्ण

गावातील पहिल्या महिला डॉक्टर होण्याचा मान

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे

जिवती:- कोरपणा तालुक्यातील लोणी येथील प्रगतशील व प्रयोगशील शेतकरी रविंद्र थेरे यांच्या कन्या कु. स्वामिनी रविंद्र थेरे यांनी वैद्यकीय क्षेत्रातील एमबीबीएस परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण करून लोणी गावातील पहिल्या महिला एमबीबीएस डॉक्टर होण्याचा मान त्यांनी मिळविला आहे.

कु. स्वामिनी यांच्या या उल्लेखनीय यशामुळे लोणी गावासह संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या बळावर त्यांनी हे यश संपादन केले असून त्यांच्या यशामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थिनींसाठी प्रेरणादायी आदर्श निर्माण झाला आहे.

स्वामिनी यांच्या यशाबद्दल ग्रामस्थ, सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांसह परिसरातील नागरिकांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तसेच थेरे कुटुंबीयांचेही सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

वैद्यकीय क्षेत्रात समाजसेवेचे कार्य करताना स्वामिनी आणखी मोठी भरारी घेतील, असा विश्वास व्यक्त करून ग्रामस्थांनी त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये