डोईफोडे वाडी येथे आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या दारी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
समर्थ कृषी महाविद्यालय, देऊळगाव राजा येथील विद्यार्थ्यांनी ग्रामीण कार्यानुभव कार्यक्रमाअंतर्गत “आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या दारी” हा उपक्रम कृषी दूत यांनी डोईफोडे (वाडी) येथे राबविला, तेथील शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन केले. या उपक्रमात कृषी दूतांनी बीज प्रक्रिया, त्याचे फायदे, माती परीक्षणाचे महत्त्व, बीज उगवण क्षमता चाचणी कशी करावी यावर सखोल माहिती दिली. शेतकऱ्यांना प्रत्यक्ष कृती करून दाखवत. या वेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन उपप्राचार्य प्रा.देवानंद नागरे , रावे समन्वयक प्रा. मोहजितसिंह राजपूत व मृदाशास्त्र विभाग प्रमुख प्रा. विलास सातपुते आणि तज्ज्ञ प्राध्यापकांनी दिले.
शेतकऱ्यांना प्रत्यक्ष कृती करून दाखवत, या संकल्पनांचे महत्त्व पटवून दिले.या उपक्रमात कृषी दूत गोविंद टाले, अक्षय उगले, सौरभ वाघ, करण वाघमारे, ओम वाकडे, विवेक वानखेडे, , दिपक झगरे,सिद्धेश्वर मिसाळ, देवाशीष सरकटे, नयन चौधरी, यांनी सहभाग घेतला या उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये आधुनिक शेतीविषयक जागरूकता निर्माण झाली असून विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात येत आहे


