ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

घराचा रस्ता अडविणाऱ्यांवर प्रशासनाचा बुलडोझर

उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कारवाईने अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

गोंडपिपरी तालुक्यातील गणेशपिपरी येथे वडिलोपार्जित मालमत्तेच्या वहिवाट रस्त्यावर करण्यात आलेले अतिक्रमण प्रशासनाने हटवून नागरिकांना दिलासा दिला.फुलचंद धोंडू दुर्गे यांचे घर गट क्रमांक १५९ मध्ये असून सदर मालमत्ता वडिलोपार्जित आहे.सन १९९५ मध्ये तोंडी आपसी हिस्सेवाटणी करण्यात आली होती.त्यानुसार गट क्रमांक १५८ वेगळा करण्यात आला व गट क्रमांक १५९ मध्ये येण्या-जाण्यासाठी पाच फूट रुंदीचा एकमेव रस्ता ठेवण्यात आला होता.

मात्र, गैरअर्जदार ऋषी दुर्गे, रूपचंद दुर्गे, पुरुषोत्तम दुर्गे, मीना दुर्गे व पंकज दुर्गे यांनी त्या रस्त्यावर ताराचे कुंपण करून घरासमोर संडास व बाथरूमचे बांधकाम केले.त्यामुळे फुलचंद दुर्गे यांचा येण्या-जाण्याचा मार्ग पूर्णपणे बंद झाला होता.स्वतंत्र रस्ता नसल्याने त्यांनी याबाबत गोंडपिपरीचे उपविभागीय अधिकारी लघीमा तिवारी यांच्याकडे तक्रार दाखल केली होती.

सदर प्रकरणाची सुनावणी घेऊन दोन्ही पक्षांचे बयान नोंदविण्यात आले.तसेच आवश्यक कागदपत्रे व लेखी उत्तर सादर करण्याची संधी प्रशासनाने दिली. सुनावणीनंतर अतिक्रमण करून वहिवाट बंद केल्याचे स्पष्ट झाल्याने संबंधित अतिक्रमण हटविण्याचे आदेश देण्यात आले.

त्या आदेशानुसार आज शुक्रवार (दि.१२ जून ) रोजी दुपारी नायब तहसीलदार अरविंद चांदेकर, मंडळ अधिकारी कौराती व तलाठी बोरकर यांच्या पथकाने घटनास्थळी धडक देत अवैध संडास-बाथरूमचे बांधकाम हटविले. तसेच जागा मोकळी करून वहिवाट रस्ता पुन्हा खुला करण्यात आला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये