देवळी पोलीसांनी चालविला ११५ गुन्हयातील अवैध दारूचे मुद्देमालावर रोडरोलर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा जिल्हा हा दारूबंदी जिल्हा असुन पोलीस स्टेशन देवळी येथील सण २०२१ ते आजपावेतो विविध प्रकारच्या देशी विदेशी दारूच्या कारवाया करून त्यामध्ये मुददेमाल जप्त करण्यात आला होता. त्यापैकी ११५ गुन्हयातील मुददेमाल नाश करणेबाबत मा. न्यायालयाने आदेश दिल्याने आज दिनांक ११/०६/२०२६ रोजी १०१ गुन्हयातील ५,४१६ देशी विदेशी दारूच्या शिश्या ज्याची अंदाजे किमंत ८,६२,०६०/-रू व १४ गुन्हयातील १९८० देशी विदेशी दारूच्या शिश्या ज्याची अंदाजे किमंत २,५४,२००/-रू असा एकुण ११५ गुन्हयातील मुददेमाल किमंत ११,१६,२६०/- रू असा माल देवळी येथील निर्जल स्थळी नेवुन रोड रोलर चालवुन नाश केले आहे. त्या दरम्यान मा.न्यायालयाने दिलेल्या आदेश प्रमाणे राज्य उत्पादन शुल्क विभाग वर्धा येबील अधिकारी/अंमलदार तसेच पंच, देवळी येथील पोलीस स्टॉफ यांचे समक्ष करण्यात कारवाई करण्यात आली.
नमुद कारवाई मा. पोलीस अधीक्षक साहेब, वर्धा मा.अपर पोलीस अधीक्षक साहेय, वर्धा यांचे निर्देशाप्रमाणे मा. उपविभागीय पोलीस अधिकारी मॅडम, पुलगाव विभाग यांचे मार्गदर्शनात देवळी पो.स्टे.ये ठाणेदार सपोनि संदीप कापडे सा, पोउपनि अश्विन गजभिये, पोहवा/१३७५ विमलनयन तिवारी, पोहवा/८०९ गणेश खेवले. पोशि/३१० संदीप वाघमारे तसेच राज्य उत्पादन शुल्क विभाग वर्धा येथील डि. वाय. राउत दुय्यम निरीक्षक, आर. यु. काष्टे दुय्यम निरीक्षक, व इतर ३ अंमलदार यांनी केली आहे



