दारू पिवुन दारूच्या नशेत वाहन चालविणा-या 1 वाहन चालक यांच्यावर कार्यवाही 1 वाहने जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा जिल्हयात अपघाताचे प्रमाण जास्त वाढल्याने होणारे अपघात कमी करण्यासाठी तसेच वाहतुक नियमांचे नागरीकांनी पालन करावे या करीता मा. पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल साहेब व मा. अपर पोलीस अधिक्षक सदाशिव वाघमारे साहेब वर्धा जिल्हा यांचे मार्ग दर्शनाखाली जिल्हातील अपघाताचे प्रमाण कमी करण्याकरीता वरीष्ठांनी ब्रिथ अॅनीलाइझर सह संपुर्ण वर्धा जिल्हयात दि. 08/06/2026 नाकेबंदी, विशेष राबविण्यात आली त्या अनुशंगाने दि. 08/06/2026 रोजी वर्धा शहरात मार्शल पेट्रोलींग दरम्याण पोलीस अंमलदार सफौ 443/अनिल तिवारी, पोशि 163/ दिलीप कामडी, पोशि 983/प्रदीप कोहळे यांनी इतवारा चौक येथे चेक केले असता नमुद 1) वाहन चालक कमांक MH 32 AP 5990 चा चालक नामे अमोल लक्ष्मणराव धुर्वे वय 36 वर्ष रा. पढेगाव त. वर्धा यांला चेक केले असता वाहन चालक हा आपले वाहन दारूचे नशेत चालवितांना मिळुन आल्याने त्यास वाहतुक नियंत्रण शाखा, वर्धा कार्यालयात आणुन त्यांची ब्रिथ अॅनालाइझर मशीन व्दारे दारू पिल्याची तपासणी केली असता त्यांचे मध्ये 191.3 mg टक्के अल्कोहोल प्रमाण मिळुन आल्ल्याने वाहन चालक यांचेवर कलम 185 मोटर वाहन कायदयालये गुन्हा नोंद करून सदर वाहन चालक यांने वाहन चालविण्याचा परवाना सोबत बाळगल्याने सदरचा वाहन परवाना आर.टि.ओ सा. वर्धा यांचे कडे मोटर वाहन कायदा 1988 कलम 19 अन्वये लायसन्स निलंबन प्रस्ताव कामी पाठविण्यात येते.
वरून सन 2026 मध्ये पुर्ण वर्धा जिल्हयाच्या ड्रंक अॅन्ड ड्राईव्ह च्या एकुण 151 केसेस, एकुण लायसन्स निलंबन प्रस्ताव 47 पाठविण्यात आले, एकुण 129/177 हेल्मेटच्या 1202 केसेस, अवैद्य प्रवासी वाहतुकच्या 66 (1)/192(अ) एकुण 93 केसेसे करण्यात आल्या आहे. वर्धा श पेट्रोलींग दरम्याण दारू पिवुन वाहन चालवु नये, हायवेवर टुव्हीलर चालवितांना हेल्मेट वापरावे, फोरव्हीलर चालवितांना सिटब्लेट लावावा जेणे करून अपघाताचे प्रमाण कमी होईल अशा वारंवार सुचणा देण्यात येत आहे व नागरीकाना आवाहन करण्यात येत आहे.
तरी सदर वाहन चालकाने वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे असे आवाहन पोलीस निरीक्षक, वाहतुक नियंत्रण शाखा, वर्धा यांचे कडून नागरीकांना करण्यात येत आहे.
पोलीस निरीक्षक विलास पाटील, वाहतुक नियंत्रण शाखा, वर्धा



