ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

घोराड ग्रामपंचायतच्या दुर्लक्षामुळे केजाजी टाऊन परिसरातील नाल्यांची दयनीय अवस्था

नागरिकांमध्ये संताप

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

 घोराड ग्रामपंचायत हद्दीतील वॉर्ड क्रमांक १ अंतर्गत केजाजी टाऊन परिसरातील सोनिया नगर वस्तीमधील नाल्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, नाल्यांमध्ये साचलेले पाणी व कचरा यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पावसाळा तोंडावर आला असतानाही संबंधित नाल्यांची साफसफाई व उपसा करण्यात आलेला नसल्याने परिसरातील रहिवाशांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, गेल्या पाच महिन्यांपासून नाल्यांमध्ये कचरा व सांडपाणी साचून राहत आहे. याबाबत अनेक वेळा तक्रारी करूनही ग्रामपंचायत प्रशासनाने कोणतीही ठोस कार्यवाही केली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. पावसाळ्यात नाल्यांमधील पाणी तुंबून डासांची उत्पत्ती वाढण्याची तसेच साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.

यापूर्वीही या समस्येबाबत संबंधित लोकप्रतिनिधी व ठेकेदारांच्या निदर्शनास बाब आणून देण्यात आली होती. मात्र, अद्यापही नाल्यांची स्वच्छता न झाल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. विशेष म्हणजे नागरिकांकडून नियमितपणे कर वसुली केली जात असताना मूलभूत स्वच्छता सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना परिसरातील रहिवाशांनी व्यक्त केली. ग्रामपंचायत घोराड येथील प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन नाल्यांची साफसफाई व उपसा करावा, तसेच पावसाळ्यापूर्वी आवश्यक उपाययोजना करून आरोग्यविषयक संकट टाळावे, अशी मागणी वॉर्ड क्र. 1येथील केजाजी टाऊन आणी सोनिया नगर रहिवासीयांनी केली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये