ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भद्रावती शहरातील विविध भागात नागरिकांना अशुद्ध पाणी पुरवठा : तात्काळ चौकशी करून नागरिकांना शुद्ध पाणी पुरवठा करा

काँगेस व वंचितच्या नगरसेवकांचे मुख्याधिकारी यांना संयुक्त निवेदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

        भद्रावती शहरातील विविध प्रभागातील नागरिकांना गेली ८ ते १० दिवसापासून अशुद्ध पाणीपुरवठा सुरू असून नळाला पिवळसर पाणी येत आहे व पाण्याला रॉकेल डिझेल व पाणी सडल्याचा वास येत असल्याचे प्रभाग क्र १२ गुंडावार प्लॉट येथील नागरिकांनी काँग्रेस नगरसेवक सुनील नामोजवार व अनिल पडोळे यांचे कडे तोंडी तक्रार केली .त्यावर तात्काळ कारवाई करत नागरिकांच्या प्रत्यक्ष भेटी घेतल्या व खरोखर नळाला दूषित पाणी पुरवठा होत आहे का याची शहानिशा केली असता असे निदर्शनास आले की खरोखर नळाला पिवळसर पाणी येत असून त्या पाण्याला रॉकेल डिझेल व पाणी सडल्याचा वास येत होता.

इतर वार्डातील पाणीपुरवठा बाबत चौकशी केली असता गौतम नगर,गुरूनगर,पंचशील वार्ड, गवराला शिवाजी नगर,हनुमान नगर विंजासंन मंजुषालेआउट, श्री नगर विश्वकर्मा नगर येथे व इतरही भागात पिवळसर पाणी पुरवठा होत असल्या बाबत फोन द्वारे तक्रारी प्राप्त झाल्या असून त्याची तात्काळ दखल घेऊन काँग्रेस सहित सर्व विरोधी नगरसेवकांनी आज मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन तात्काळ चौकशी करून नागरिकांना होत असलेल्या अशुद्ध पाणी पूरवठा होऊ नये या साठी उपाय योजना करून शुद्ध पाणी पुरवठा करण्यात यावा अशी मागणी केली अशा अशुद्ध पाणी पुरवठ्या ही गंभीर बाब असून त्यामुळे नागरिकांचा पिण्याचा पाण्याचा व आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.तात्काळ उपाय योजना न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे. शहरात असा प्रकार घडत असताना लोकांना 24 तास शुद्ध पाणी पुरवठा करू म्हणणारे नगर पालिकेचे सत्तारूढ पदाधिकारी सहली करण्यात गुंग आहे हे विशेष. निवेदन देते वेळी माजी नगराध्यक्ष, नगरसेवक सुनील नामोजवार.काँग्रेस पक्षाच्या गटनेत्या सौ सरिता सूर, नगरसेवक अनिल पडोळे,नगरसेविका कल्पना भुसारी, वंचित च्या नगरसेविका  उरविला साव,नगरसेविका उषा जाधव,नगरसेविका पल्लवी तामगडे,नगरसेवक प्रथम गेडाम उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये