अध्यात्मातून परिवर्तनाचा प्रवास म्हणजेच प्रेरणेची मशाल _ आ. भोंगळे
विहीरगावात पाचशे व्यसनमुक्त झालेल्यांचा सन्मान

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
व्यसन आयुष्याचा सत्यानाश करतात. स्वतसोबतच कुटंबियांची दैना करणारी हि सवय सर्वाथाने घातक आहे. अशात शेषराव महाराज व्यसनमुक्त संघटनेने त्यांच्या आयुष्याला कलाटणी दिली आहे. अध्यात्मातून परिवर्तनाचा हा प्रवास समाजासाठी प्रेरणेची नवी मशाल देणारी ठरली आहे. गेल्या काही वर्षात या उपक्रमाच्या माध्यमातून बारा हजार नागरिकांना दारूला ना करित आपल्या आयुष्यात बहार आणली. संघटनेचे हे काम ईश्वरीय आहे, असे प्रतिपादन आमदार देवराव भोेंगळे यांनी केले.
परमपुज्य शेषराव महाराज व्यसनमुक्त संघटनेच्या माध्यमातून विहीरगांव येथे भव्य सत्काराचा कार्यक्रम घेण्यात आला, यावेळी ते बोलत होते. जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश चौधरी, अल्का आत्राम, अमर बोडलावार, मुन्ना सिडाम, दिपक सातपूते, गणपती चौधरी, राहुल चौधरी, निलेश पुलगमकर, इंद्रपाल धुडसे, बालु पिंपळशेंडे, विशाल मडावी, राकेश पून, स्वप्नील अनमुलवार यांच्यासह हजारो नागरिकांची यावेळी उपस्थिती होती.
गोंडपिपरी तालुक्यातील विहीरगाव येथे शेषराव महाराज व्यसनमुक्त संघटनेच्या माध्यमातून गेल्या काही वर्षापासून सामाजिक दायीत्वाचा भाग लक्षात घेता व्यसनमुक्तीसाठी विविध उपक्रम राबविल्या जात आहेत. याकाळात याठिकाणी चंद्रपूर, गडचिरोली जिल्यासह तेलंगणातील जवळपास बारा हजार नागरिक व्यसनमुक्त झाले आहेत. या समाजहिताच्या कामाकरिता जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश चौधरी यांनी आपली मोक्यावरील जागा दान दिली. आज येथे सुसज्ज मंदीर उभारण्यात आले आहे. राजुरा मतदारसंघाचे आमदार देवराव भोंगळे यांनी या कार्यात संघटनेला मोठी मदत केली.
दरम्यान जागतिक पर्यावरण दिनी पार पडलेल्या कार्यक्रमात संघटनेच्या वतीने आमदार देवराव भोंगळे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून संघटनेच्या कामाचे कौतूक करित त्यांचे आभार मानले. याप्रसंगी मंदीर परिसराचा सर्वागिण विकास करण्यासाठी आपण कटिबध्द असल्याची ग्वाही आमदारांनी दिली.
*पाचशे दाम्पत्यांचा सत्कार*
व्यसनमुक्त संघटनेच्या माध्यमातून पाचशे नागरिक गेल्या पाच वर्षापासून पूर्णपणे व्यसनमुक्त झालेत. आमदार देवराव भोंगळे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.



