अपघात कमी करण्यासाठी तसेच वाहतुक नियमांचे नागरीकांनी पालन करावे

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा :_ जिल्हयात अपघाताचे प्रमाण जास्त वाढल्याने होणारे अपघात कमी करण्यासाठी तसेच वाहतुक नियमांचे नागरीकांनी पालन करावे या करीता मा. पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल साहेब व मा. अपर पोलीस अधिक्षक सदाशिव वाघमारे साहेब वर्धा जिल्हा यांचे मार्ग दर्शनाखाली विशेष मोहीम….
जिल्हातील अपघाताचे प्रामण कमी करण्याकरीता वरीष्ठांना ब्रिथ अॅनीलाइझर सह सर्व पोलीस स्टेशन येथील 1 अधिकारी 3 पोलीस अंमलदार व वाहतुक पोलीस अंमलदार, महामार्ग जाम येथील सुध्दा पोलीस अंमलदार यांची संपुर्ण वर्धा जिल्हयात दि. 05/06/2026 नाकेबंदी, विशेष राबविण्यात आली त्या अनुशंगाने दि. 05/06/2026 रोजी वर्धा शहरात मार्शल पेट्रोलींग दरम्याण पोलीस अंमलदार सफौ 443/अनिल तिवारी, पोहवा 1492/ चंद्रकांत तपासे, पोहवा / 1265 मुकेश राऊत, पोशि 983/प्रदीप कोहळे यांनी नमुद 1) वाहन कमांक एम.एच 32 ए.एम 5533 चे वाहन चालक नामे प्रशांत देवरावजी आमटे वय 45 वर्ष रा. समतानगर वर्धा याला मार्शल पेट्रोलींग दरम्याण इतवारा चौक येथे चेक केले असता वाहन चालक हा आपले वाहन दारूचे नशेत चालवितांना मिळुन आल्याने त्यास वाहतुक नियंत्रण शाखा, वर्धा कार्यालयात आणुन त्यांची ब्रिथ अॅनालाइझर मशीन व्दारे दारू पिल्याची तपासणी केली असता त्यांचे मध्ये 105.0 mg टक्के अल्कोहोल प्रमाण मिळुन आले. तसेच नमुद 2) वाहन कमांक एम. एच 32 झेड 8936 चे वाहन चालक नामे श्रीधर प्रमोदराव गाडेकर वय 32 वर्ष रा. वाटखेडा ता देवळी वर्धा याला मार्शल पेट्रोलींग दरम्याण इतवारा चौक येथे चेक केले असता वाहन चालक हा आपले वाहन दारूचे नशेत चालवितांना मिळुन आल्याने त्यास वाहतुक नियंत्रण शाखा, वर्धा कार्यालयात आणुन त्यांची ब्रिथ अॅनालाइझर मशीन व्दारे दारू पिल्याची तपासणी केली असता त्यांचे मध्ये 235.5 mg टक्के अल्कोहोल प्रमाण मिळुन आले. सदर दोन्ही वाहन चालक यांचेवर कलम 185 मोटार वाहन कायद्यान्वये अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. तसेच दोन्ही वाहन चालकाजवळ लायसन्स नसल्याने कलम 3(1), 181/177 मोवाका अन्वये कलम वाढ करण्यात आली.
तसेच रोजचे नाकेबंदी दरम्याण ब्रिथ ॲनालाइझर मशीन सह 4 पोलीस स्टेशन मधील पोलीस अंमलदार यांनी 1) पोस्टे आर्वी यांनी वाहन चालक नामे मयुर रामेश्रवर ठाकरे वय 25 वर्ष रा. वाढोणा (ठाकरे) त. आर्वी जिल्हा वर्धा यांचेवर कलम 185 मोटार वाहन कायद्यान्वये अन्वये गुन्हा नोंद केला 2) पोस्टे सिंदी यांनी वाहन चालक नामे ब्रजलाल श्यामलाल डेहरीया वय 27 वर्ष रा. शिवणी (मध्यप्रदेश) ह.मु. हेलोडी ता. सेलु.जि. वर्धा यांचेवर कलम 185 मोटार वाहन कायद्यान्वये अन्वये गुन्हा नोंद केला. 3) पोस्टे हिंगणघाट यांनी वाहन चालक नामे विलासराव गुलाबराव जगताप वय 56 वर्ष रा. जामणी ता. हिंगणघाट जि. वर्धा यांचेवर कलम 185 मोटार वाहन कायद्यान्वये अन्वये गुन्हा नोंद केला. 4) पोस्टे सेवाग्राम यांनी वाहन चालक नामे रवी रामकृष्ण कुमरे वय 39 वर्ष रा. बरबडी यांचेवर कलम 185 मोटार वाहन कायद्यान्वये अन्वये गुन्हा नोंद केला.
तसेच सन 2026 मध्ये पुर्ण वर्धा जिल्हयाच्या ड्रंक ॲन्ड ड्राईव्ह च्या एकुण 150 केसेस, एकुण निलंबन प्रस्ताव 45 पाठविण्यात आले, एकुण 129/177 हेल्मेटच्या 1202 केसेस, अवैद्य प्रवासी वाहतुकच्या 66 (1)/192(अ) एकुण 93 केसेसे करण्यात आल्या आहे. वर्धा शहर पेट्रोलींग दरम्याण दारू पिवुन वाहन चालवु नये, हायवेवर टुव्हीलर चालवितांना हेल्मेट वापरावे, फोरव्हीलर चालवितांना सिटब्लेट लावावा जेणे करून अपघाताचे प्रमाण कमी होईल अशा वारंवार सुचणा देण्यात येत आहे व नागरीकाना आवाहन करण्यात येत आहे.
तरी सदर वाहन चालकाने वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे असे आवाहन पोलीस निरीक्षक, विलास पाटील वाहतुक नियंत्रण शाखा, वर्धा यांचे कडून नागरीकांना करण्यात येत आहे.
पोलीस निरीक्षक विलास पाटील
वाहतुक नियंत्रण शाखा, वर्धा



