तारसा (बुज.) येथे शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा
छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना माल्यार्पण; नागरिकांच्या समस्यांचा तत्काळ निराकरणाचा प्रयत्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे
गोंडपिपरी :_ हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त तारसा (बुज) येथे शिवराज्याभिषेक उत्सव समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून अभिवादन केले. तसेच स्थानिक आंबेडकर चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मानवंदना दिली.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना वक्त्यांनी सांगितले की, रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा केवळ एका राजाचा राज्यारोहण सोहळा नव्हता, तर गुलामगिरी व परकीय सत्तेविरुद्ध उभ्या राहिलेल्या स्वाभिमानी जनतेच्या संघर्षाचा ऐतिहासिक विजय होता. स्वराज्य, स्वाभिमान आणि राष्ट्रनिष्ठेची प्रेरणा देणारा हा दिवस महाराष्ट्राच्या इतिहासातील सुवर्णक्षण असून प्रत्येक नागरिकाच्या मनात अभिमान जागवणारा आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केवळ सत्ता मिळविण्यासाठी नव्हे, तर शोषित, वंचित आणि सर्वसामान्य जनतेला न्याय, सुरक्षा व स्वाभिमान मिळवून देण्यासाठी केली. त्यांची लोकाभिमुख प्रशासन व्यवस्था, सुदृढ लष्करी संघटना, किल्ल्यांचे व्यवस्थापन, सागरी सामर्थ्य, स्त्रीसन्मान, सर्वधर्मसमभाव आणि लोककल्याणकारी शासनव्यवस्था आजही आदर्शवत असल्याचे सांगत त्यांच्या विचारांवर चालण्याचा संकल्प करण्याचे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमानंतर स्थानिक नागरिकांनी विविध विकासकामे व समस्यांबाबत निवेदने सादर केली. यावेळी नागरिकांशी आत्मीय संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेण्यात आल्या तसेच संबंधित प्रश्नांच्या निराकरणासाठी सकारात्मक प्रयत्न करण्याचे आश्वासन देण्यात आले.
या प्रसंगी भाजपचे गोंडपिपरी तालुकाध्यक्ष दिपक सातपुते, माजी जिल्हा परिषद सदस्य अमर बोडलावार, गोंडपिपरी शहराध्यक्ष चेतन गौर, जिल्हा ओबीसी मोर्चाचे महामंत्री बबन निकोडे, महामंत्री निलेश पुलगमकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती इंद्रपाल धूडसे, उपसभापती स्वप्नील अनमूलवार, भाजयुमो तालुकाध्यक्ष राकेश पून, भानेश येग्गेवार, शिथिल लोणारे, वैभव बोनगीरवार, राजकुमार भडके, श्रीकृष्ण निखाडे, रत्नमाला भडके, देवानंद कुत्तरमारे, प्रकाश फरकडे, अनिल फरकडे, श्यामसुंदर चंदे, प्रज्वल बट्टे, माणिकचंद उराडे, कांता भडके, रूपाली कुकुडकर, कोमल उराडे, सुमन कुकुडकर, आशा सोनटक्के यांच्यासह शिवराज्याभिषेक उत्सव समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.



