ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अल्पवयीन मुलीचे अपहरण, अत्याचार व पोक्सो कायद्यांतर्गत गुन्ह्यात आरोपीस २० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

पोलीस स्टेशन पुलगाव येथे २०२४ मध्ये अपराध क्र. ३३२/२०२४ कलम ३६३, ३६६(अ), ३७६(२)(एन) भा.दं.वि. सहकलम ४, ६ बालकाचे लैंगिक अपराधा पासुन संरक्षण अधिनियम २०१२ व सहकलम ३(१)(w)(I)(ii), ३(२)(v), ३(२)(va) अ.जा.अ.ज. (अत्याचार प्रतिबंधक) कायदा मधील फिर्यादी यांची १६ वर्षाची मुलगी ही दिनांक ०७/०४/२०२४ रोजी रात्री घरामध्ये झोपलेली असताना दि.०८/०४/२०२४ चे सकाळी पलंगावर न दिसल्याने शोध घेतला असता मिळून आली नाही. चौकशीदरम्यान घराशेजारी राहणारा आरोपी नामे विजय सूर्यवंशी याने फिर्यादीच्या मुलीस पळवून नेल्याच्या तोंडी रिपोर्टवरून वरीलप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता.

सदर गुन्ह्यातील आरोपी नामे विजय सूर्यवंशी याची मा. जिल्हा व सत्र न्यायालय-३ वर्धा (मा. अन्सारी मॅडम) यांच्या कोर्टात केस क्र. ६९/२०२४ सुरू असतांना तपासी अधिकारी तत्कालीन पो.अधी. राहुल चव्हाण, तसेच विद्यमान उपविभागीय पोलीस अधिकारी पुलगांव वंदना कारखेले, सरकारी अभियोक्ता श्री. प्रसाद सोईतकर व कोर्ट पैरवी पोलीस उपनिरीक्षक अनंता रिंगणे यांनी गुन्ह्यातील साक्षीदारांना योग्य पद्धतीने मार्गदर्शन केल्याने मा. कोर्टाने आरोपीस खालीलप्रमाणे शिक्षा सुनावली आहे:

 * **कलम ३६३ भा.दं.वि. मध्ये:** ०४ वर्षे सश्रम कारावास व ₹ २,०००/- आर्थिक दंड, दंड न भरल्यास ०३ महिने साधा कारावास.

 * **कलम ३७६(२)(एन) भा.दं.वि. व कलम ४, ६ पोक्सो कायदा मध्ये:** २० वर्षे सश्रम कारावास व ₹ ५०,०००/- आर्थिक दंड, दंड न भरल्यास ०१ वर्ष साधा कारावास.

सदरची कारवाई ही मा. श्री. सौरभ अग्रवाल, पोलीस अधीक्षक सा. वर्धा, मा. श्री. सदाशिव वाघमारे, अपर पोलीस अधीक्षक सा. वर्धा, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, पुलगांव वंदना कारखेले व पोलीस स्टेशन पुलगाव चे ठाणेदार, सदाशिव ढाकणे तपासी अधिकारी व कोर्ट पैरवी पोउपनि अनंता रिंगणे यांनी यशस्वीरित्या पार पाडली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये