ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वर्धा जिल्हातील ०२ सराईत गुन्हेगारांना केले हद्दपार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा जिल्ह्यातील गुन्हेगारांचा समुळ उच्चाटन करण्याचे उद्देशाने मा. पोलीस अधीक्षक, श्री. सौरभ कुमार अग्रवाल यांनी वर्धा जिल्हयातील शरीराविरुध्दचे गुन्हे करण्याचे सवईचे, लोकांमध्ये दहशत निर्माण करणे. शरिरावीरुध्दचे गंभीर गुन्हे ज्यामध्ये खुनाचा प्रयत्न करणे, गंभीर दुखापत करणे, घातक शस्त्र बाळगणे, तसेच मादक पदार्थ (एम. डी.) बाळगणे एन. डी. पी. एस. कायदा अन्वये गुन्हे करणारे व्यक्ती विरुध्द मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५५ अन्वये तडीपार प्रस्ताव सादर करण्या बाबात आदेशीत केले होते.

त्यानुरसार पोलीस स्टेशन रामनगर ठाणेदार यांनी सादर केलेल्या प्रस्तावावरुन मा. पोलीस अधीक्षक साहेब वर्धा यांचे आदेशान्वये खालील नमुद सराईत गुन्हेगारांना वर्धा जिल्हातुन १ वर्ष, ०६ महिने करीता वर्धा जिल्हयातुन हद्दपार केले आहे.

१) जुनेद खॉ शकील खॉ पठाण वय २३ वर्ष रा. इंदिरानगर आर्वी नाका वर्धा ता.जि. वर्धा २) रेहान अंसार खॉ पठाण वय २० वर्ष रा. इंदिरानगर आवी नाका वर्धा ता.जि. वर्धा

सदर आदेश तामीली करीता पोलीस स्टेशन रामनगर येथील अधिकारी व अंमलदार यांनी सदर हद्दपार गुन्हेगारांचे शोध संबंधाने युध्द स्तरावर मोहीम राबवून त्यांचा शोध घेवुन अंमलबजावणी करण्यात आली असुन त्यांना वधां जिल्हयातुन हद्दपार करण्यात आले आहे.

सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक, श्री. सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक, डॉ. सदाशिव वाधमरे यांचे मार्गदर्शनात पो.नि. विनोद चौधरी, स्था.गु.शा.वर्धा, पो.नि. श्रीमती पोर्णीमा राखोंडे ठाणेदार पोलीस स्टेशन रामनगर, तसेच पो. हवा. गजानन इवनाथे/१२२६, पो. अंम. राहुल भोयर /७२४, पो. अंम. रुपेश उगेमुगे/८८९ पो.स्टे. रामनगर, पो. हवा. रामेश्वर नागरे / १४५३, पो. अंम. दिनेश करलुके/१५७८, स्था.गु.शा. वर्धा, यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये