ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नेहरू विद्यालय सालोड हिरापूर येथे स्वसुरक्षा, सायबर सुरक्षा व रस्ता सुरक्षेबाबत मार्गदर्शन शिबीर संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दिनांक ५ सप्टेंबर २०२६ रोजी नेहरू विद्यालय, सालोड हिरापूर येथे वर्ग ५ वी ते १० वी च्या विद्यार्थ्यांसाठी स्वसुरक्षा, सायबर सुरक्षा, अंमली पदार्थ विरोधी जनजागृती आणि रस्ता सुरक्षा या अत्यंत महत्त्वाच्या विषयांवर विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वाढत्या डिजिटल युगात विद्यार्थ्यांना सायबर गुन्ह्यांपासून सावध ठेवणे, वाहतूक नियमांचे पालन करण्याचे संस्कार घडवणे आणि व्यसनमुक्तीबाबत जागृती निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.

या मार्गदर्शन शिबिराला शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थी मिळून २०० जणांची उल्लेखनीय उपस्थिती होती. उपस्थितांना सायबर विश्वातील धोके, ऑनलाइन सुरक्षितता, मोबाईलचा योग्य वापर, अंमली पदार्थांचे दुष्परिणाम आणि रस्ता सुरक्षेचे नियम यांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

या उपक्रमांतर्गत आदिवासी मुलींचे वसतिगृह तसेच जानकीदेवी बजाज कन्या छात्रालय, वर्धा येथील एकूण ५२ विद्यार्थिनींना विशेष मार्गदर्शन करण्यात आले. मुलींच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या ‘दामिनी हेल्पलाइन’चे माहितीपर पोस्टर वितरित करण्यात आले. तसेच विद्यार्थिनींना कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत स्वतःचे रक्षण कसे करावे (स्वसुरक्षा), सायबर सुरक्षेचे नियम आणि रस्ता सुरक्षेबाबत मोलाचे टिपण व मार्गदर्शन देण्यात आले.

विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव आणि सुरक्षेबाबत सतर्कता निर्माण करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये