ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

तळेगांव पोलीस स्टेशन हद्यीतील मौजा वर्धमनेरी ता. आर्वी येथे बोगस डॉक्टरवर कारवाई

आरोपी बोगस डॉक्टरास तिन दिवसांची पोलीस कोठडी मंजूर.

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वैद्यकिय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग, महाराष्ट्र शासन म.रा. मुंबई यांचे आदेशान्वये बोगस डॉक्टरांवर कारवाई करणे करीता स्थापण केलेल्या तालुकास्तरीय समिती व पोलीस स्टेशन तळेगांव (शा.पं.) च्या संयुक्त पथकाने दिनांक ४/९/२०२६ रोजी आर्वी तालुक्यातील मौजा वर्धमनेरी येथे मागील दोन महीण्यापासुन सुरू असलेल्या बोगस डॉक्टर च्या वैद्यकिय व्यवसायावर कारवाई करून बोगस डॉक्टर नामे रंजनकुमार नालिनी मंडल, वय ५२ वर्षे, रा. नेताजीपल्ली, पो. नोआपारा, जि. २४ परगना (पश्चीम बंगाल) ह.मु. विठ्ठल वार्ड आर्वी तह. आर्वी जि. वर्धा यांनी साईराम नावाने थाटलेल्या अनाधिकृत दवाखान्याची झडती घेतली असता त्याचे दवाखान्यात अॅलोपॅथी औषधी साठा मिळुन आला, तसेच त्याचेजवळ वैद्यकिय शिक्षणाची कोणतीही वैध पदवी तसेच महाराष्ट्र राज्यात वैद्यकिय व्यवसाय करण्याकरीता आवश्यक नोंदणी प्रमाणपत्र असे कोणतेही दस्तऐवज मिळुन आले नाही व साईराम नावाने दवाखाना तसेच स्वतःचे नावापुढे डॉक्टर असे पद नमुद करून दवाखान्यावर बोर्ड लावुन असल्याचे आढळुन आले.

बोगस डॉक्टर नामे रंजनकुमार नालिनी मंडल याने त्यांचेकडे कोणत्याही वैद्यकिय शिक्षणाची वैध पदवी नसतांना तसेच कोणताही वैध नोंदणी परवाना नसतांना अनाधिकृतपणे वैद्यकिय व्यवसाय (दवाखाना) थाटुन स्वतः डॉक्टर असल्याचे लोकांना भासवुन तोतयेगीरी करून रूग्नांना अॅलोपॅथी औषधी ची विकी करण्याकरीता स्वतः जवळ बाळगुन असल्याचे मिळुन आल्याने सदर बाबत डॉ. उषा कवरासे, तालुका आरोग्य अधिकारी, आर्वी यांनी पोलीस स्टेशन तळेगांव (शा.पं.) येथे दिलेल्या तक्रारीवरून पोलीस स्टेशनला अप.क. ४६५/२०२६ कलम ३१९ (२), २७८ भारतीय न्याय संहिता सह कलम ३३ (१), (२) महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसायी अधिनियम १९६१ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा तपास श्री. मंगेश भोयर ठाणेदार पोस्टे तळेगांव (शा.पं.) हे स्वतः करीत असुन आरोपीस गुन्हयात अटक करून मा. न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिन दिवसांची पोलीस कोठडी मंजुर केली आहे.

सदरची कार्यवाही श्री. शिवशंकर इंगोले, गटविकास अधिकारी आर्वी, डॉ. उषा कवरासे, तालुका आरोग्य अधिकारी आर्वी, श्री. मंगेश भोयर, ठाणेदार पोस्टे तळेगांव, डॉ. सौदामीनी हरडे, वैद्यकिय अधिकारी प्रा. आ. केंद्र जळगांव, श्री. गोपाल चौधरी, विस्तार अधिकारी आरोग्य पं.सं. आर्वी, श्री. संदिप वाघ, औषध निर्माण अधिकारी, प्रा.आ.केंद्र जळगांव, पोहवा निखील काळे पोस्टे तळेगांव यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये