ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

निवृत्त पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्याशी संवाद

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर सहकार्याचे आवाहन.

चांदा ब्लास्ट

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासन व निवृत्त पोलीस अधिकारी-कर्मचारी यांच्यात समन्वय व संवाद राहावा, या उद्देशाने आज पोलीस स्टेशन रामनगर व पोलीस स्टेशन वर्धा शहर यांच्या संयुक्त विद्यमाने पोलीस स्टेशन वर्धा शहर येथील सभागृहात निवृत्त पोलीस अधिकारी व अंमलदार यांची बैठक आयोजित करण्यात आली. सदर बैठकीस उपविभागीय पोलीस अधिकारी वर्धा श्री. सुनील महाडीक तसेच पोलीस निरीक्षक श्री. नागेशकुमार चतरकर, पोलीस स्टेशन वर्धा शहर आणि पोलिस निरीक्षक श्रीमती पोर्णिमा राखुंडे पो. स्टे रामनगर हे उपस्थित होते. बैठकीस सुमारे 15 ते 20 निवृत्त पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी उपस्थिती दर्शविली.

बैठकीदरम्यान उपस्थित निवृत्त पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्याशी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. त्यांच्या अडचणी, समस्या व अपेक्षा जाणून घेऊन त्याबाबत आवश्यक ती कार्यवाही व सहकार्य करण्याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली. पोलीस विभागात सेवा बजावताना प्राप्त झालेले त्यांचे अनुभव व मार्गदर्शन हे आजही पोलीस प्रशासनासाठी उपयुक्त ठरू शकते, याबाबतही संवाद साधण्यात आला. तसेच आगामी सण-उत्सवांच्या अनुषंगाने शहरातील शांतता व सुव्यवस्था कायम राहावी, कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि नागरिकांनी सण-उत्सव शांततेत व उत्साहात साजरे करावेत, यासाठी पोलीस प्रशासनास आवश्यक ते सहकार्य करण्याचे आवाहन उपस्थित निवृत्त पोलीस अधिकारी व अंमलदार यांना करण्यात आले.

निवृत्त पोलीस अधिकारी व अंमलदार यांनीही पोलीस प्रशासनास आवश्यक ते सहकार्य करण्याची सकारात्मक भूमिका व्यक्त केली. सदर बैठकीमुळे पोलीस प्रशासन व निवृत्त पोलीस अधिकारी-कर्मचारी यांच्यातील समन्वय अधिक दृढ होण्यास मदत झाली. सदर बैठक दुपारी 12.30 ते 13.30 वाजेपर्यंत शांततेत व उत्स्फूर्त वातावरणात पार पडली

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये