ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शिक्षक दिनानिमित जिल्हास्तरीय शिक्षक गुणगौरव सोहळा उत्साहात

शिक्षक मित्र उपक्रमातून टीईटी परीक्षेसाठी ऑनलाइन मार्गदर्शन वर्ग _ सीईओ पराग सोमण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

शिक्षक दिनाचे औचित्य साधत जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्यावतीने जिल्हास्तरीय शिक्षक गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी जिल्ह्यातील गुणवंत शिक्षक तसेच विविध परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. शिक्षक मित्र उपक्रमातून टीईटी परीक्षेसाठी ऑनलाइन मार्गदर्शन वर्ग राबविण्यात येणार असल्याचे यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण होते. कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांचे अधिकारी तसेच ५०० हून अधिक शिक्षक, वि‌द्यार्थी, पालक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिल्ह्यातील शिक्षकांनी टीईटी परीक्षा उत्तीर्ण होऊन आपली शैक्षणिक व व्यावसायिक गुणवत्ता वाढवावी, या उद्देशाने पराग सोमण यांनी शिक्षक मित्र उपक्रमांतर्गत ऑनलाइन मार्गदर्शन वर्ग सुरु करण्याची महत्त्वपूर्ण घोषणा यावेळी केली. या उपक्रमा‌द्वारे शिक्षकांना टीईटी परीक्षेच्या तयारीसाठी तज्जांचे मार्गदर्शन, अभ्यासाचे नियोजन तसेच आवश्यक शैक्षणिक सहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच त्यांनी शिक्षकांच्या कार्याचे कौतुक करतांना जिल्ह्यातील प्रत्येक शिक्षकाने स्वतःची गुणवत्ता वाढवून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी योगदान देण्याचे आवाहन केले.

गुणगौरव सोहळ्यात जिल्ह्यातील आठही तालुक्यांमधून प्रत्येकी एका गुणवंत शिक्षकाची निवड करून एकूण ८ शिक्षकांचा शाल, श्रीफळ, साडी व मोमेंटो देऊन सन्मान करण्यात आला. शिक्षणाधिकारी सीमा पाटील यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाची भूमिका व उद्दिष्टे स्पष्ट केली. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज गोहाड यांनी आपल्या मनोगतात शिक्षक हे समाज व राष्ट्र‌निर्मितीचे प्रमुख आधारस्तंभ असून, वि‌द्यार्थ्यांच्या गुणवत्तावृ‌द्धीसाठी शिक्षकांनी सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचे आवाहन केले.

यावेळी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेला प्रोत्साहन देण्यासाठी इयता ४ थी, ७ वी तसेच ५ वी, ८ वीच्या NMMSS परीक्षेत पात्र ठरलेल्या एकूण 100 विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. याशिवाय जवाहर नवोदय वि‌द्यालयाच्या प्रवेश परीक्षेत निवड झालेल्या ३६ विद्यार्थ्यांचाही प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

शिक्षकांच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव आणि गुणवंत वि‌द्यार्थ्यांना प्रोत्साहन देणारा हा सोहळा जिल्ह्यातील शैक्षणिक गुणवता वृद्धीसाठी प्रेरणादायी ठरला. गुणवंत शिक्षकांचा सन्मान, गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव आणि शिक्षकांच्या गुणवत्तावृ‌द्धीसाठी ‘शिक्षक मित्र’ उपक्रम हा कार्यक्रमाचा विशेष केंद्रबिंदू ठरला. कार्यक्रमाचे संचलन नीता भांडवलकर यांनी केले तर आभार उपशिक्षणाधिकारी रुपेश कांबळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचारी, शिक्षक तसेच संबंधित सर्वांनी सहकार्य केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये