ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालयाच्या वतीने उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार प्राप्त बंडोपंत बोढेकर यांचा गौरव

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

       राष्ट्रीय शिक्षक दिनानिमित्त विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण क्षेत्रातून यावर्षी ऋषी अगस्त्य शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील ज्येष्ठ कर्मशालेय गणित व अभियांत्रिकी चित्रकला निदेशक बंडोपंत बोढेकर यांना नुकतेच उत्कृष्ट शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

       प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात सदर पुरस्काराचे वितरण शिक्षक आ. सुधाकर अडबाले, आ. अभिजित वंजारी ,माजी आ. डायगव्हाणे, डॉ . बबनराव तायवाडे, प्राचार्य डॉ. शरयु तायवाडे, गोविंद मैना फाऊंडेशनच्या अध्यक्ष सौ. सिमाताई अडबाले, माजी सिनेट सदस्य श्री. सुनिल शेरकी आदींच्या उपस्थितीत करण्यात आले.

        कर्मशालेय गणित व अभियांत्रिकी चित्रकला निदेशक म्हणून श्री. बंडोपंत बोढेकर हे गेल्या ३३ वर्षांपासून व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण खात्यात सेवारत असून आय.टी. आय. च्या प्रशिक्षणार्थांच्या सातत्यपूर्ण गुणवत्ता वाढीसाठी प्रामाणिकपणे झटणारे एक समर्पित व्यक्तीमत्व आहे. राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी, प्रभारी गटनिदेशक म्हणून त्यांनी सेवा दिलेली आहे.

    पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी डॉ. वैभव बोनगीरवार यांनी जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालयात त्यांना पुष्पगुच्छ व ग्रंथभेट देऊन सन्मानित करण्यात आले आणि शुभेच्छा दिल्यात. यावेळी डिव्हीइओ कार्यालयाचे श्री. मिलमिले, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे निदेशक विलास खेडेकर,अभय घटे, रमेश रणदिवे, किशोर इरदंडे, सचिन महिंद्रकर, महेश नाडमवार, नंदकिशोर गराड, स्टोअर विभागाचे श्री. रामटेके आदी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये