ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गणेशोत्सव मंडळ व डि.जे. चालक/मालक यांची बैठक संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दिनांक 07.09.2026 रोजी पोलीस स्टेशन आवाँ जिल्हा वर्धा हहीमध्ये आगामी सण-उत्सव चे अनुषंगाने प्रशासकीय ईमारत आर्वी येथे श्री. सदाशिव वाघमारे, अपर पोलीस अधीक्षक, वर्धा, श्री.विश्वास शिरसाट, उपविभागीय अधिकारी, आर्वी तसेच श्री. राहुल आत्राम (भा.पो.से.) उपविभागीय पोलीस अधिकारी, आर्वी यांचे उपस्थीत सार्वजनिक गणपती मंडळाचे अध्यक्ष-उपाध्यक्ष तसेच डि.जे. चालक/ मालक यांची बैठक आयोजीत करण्यात आली.

यावेळी आगामी सण-उत्सव शांततेत, सौहार्दपूर्ण व उत्साहपुर्ण वातावरणात पार पाडण्याकरीता सर्वांना पोलीस विभागातर्फे आवाहन करण्यात आले, अपर पोलीस अधीक्षक यांचेकडून ध्वनिक्षेपक, लाऊडस्पीकर, अॅम्प्लीफायर व इतर ध्वनी निर्माण करण्यार्या उपकरणांचे वापराबाबत कलम 36, 38(1) म.पो.का.-1951 अन्वये संपुर्ण जिल्ह्यात दिनांक 05.09.2026 चे 01.00 वा. ते दिनांक 29.09.2026 चे 24.00 वा. पावेतो आदेशा पारीत करण्यात आल्याबाबत माहीती देण्यात आली. तसेच संपुर्ण वर्धा जिल्ह्यात मा. जिल्हाधिकारी, वर्धा यांनी दिनांक 04.09.2026 ते दिनांक 28.09.2026 पावेतो लेझर लाईट वापरास प्रतीबंध बाबत आदेशा पारीत केल्याबाबत माहीती देण्यात आली. सदर आदेशाचे उल्लंघन करणार्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार असल्याचे मा. अपर पोलीस अधीक्षक यांनी सांगितले, वर्धा जिल्हा पोलीसांकडून आगामी गणेशोत्सव दरम्यान “गणराया उत्कृष्ट सार्वजनिक गणेश मंडळ स्पर्धा-2026” चे आयोजन करण्यात आले असून सायबर सुरक्षित गणेशोत्सव, अंमली पदार्थ विरोधी अभियान, महीला व बाल सुरक्षा, वाहतुक सुरक्षा, पर्यावरण पुरक गणेशोत्सव, आरोग्य तपासणी शिबीर, कायदा व सुव्यवस्था शिस्त या विषयांवर स्पर्धा आयोजित केली असून प्रत्येक पोलीस स्टेशन स्तरावर व पोलीस अधीक्षक कार्यालय स्तरावर 3 उत्कृष्ट गणेश मंडळ यांना पारीतोषीक देवून सन्मान करणार असल्याची माहीती दिली.

तसेच धार्मीक भावना दुखावतील अशा प्रकारच्या अफवा, आक्षेपार्ह वक्तव्य तसेच मिडीया वरील भडकावू संदेश व पोस्ट प्रसारीत करू नये तसेच कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवण्यापुर्वी पोलीसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले. तसेच मिरवणूका, ध्वनिक्षेपक, गर्दीचे नियोजन, महीला व बालकांची सुरक्षितता, शहरातील वाहतूक व्यवस्था, विसर्जन घाटाबाबत धार्मीक स्थळांची सुरक्षा आणि कायदा व सुव्यवस्था राखण्याबाबत आवश्यक सुचना देण्यात आल्या, पोलीस प्रशासन व नागरीक यांच्यातील समन्वय, परस्पर विश्वास आणि सहकार्याच्या माध्यमातून आर्वी शहरात शांतता व सामाजिक सलोखा कायम ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

बैठकीमध्ये श्री. विश्वास शिरसाट, उपविभागीय अधिकारी, आर्वी तसेच श्री. राहुल आत्राम (भा.पो.से.) उपविभागीय पोलीस अधिकारी, आर्वी, श्री. सतीश डेहनकर, पोलीस निरीक्षक, आर्वी तसेच पोलीस स्टेशन आर्वी हट्टीतील सार्वजिनिक गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी व डि.जे, वाद्याचे चालक मालक असे उपस्थित होते.

(सतिश डेहनकर) पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन आर्वी जि. वर्धा

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये