गावठी मोहा दारुचा मोहा सडवा रसायन एकुण किंमत 4 लाख 61 हजाराचा मुद्देमाल जप्त करून कार्यवाही
पोलीस स्टेशन सेलू येथील डी. बी पथकाने प्रो. रेड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
दिनांक 07/09/2026 रोजी पोलीस स्टेशन सेलूचे गुन्हे अन्वेषण पथक परिसरात पेट्रोलिंग करीत असताना मुखबीरद्वारे माहिती मिळाली की संदीप ठाकरे रा देवनगर (हिंगणी) हा मौजा जुनेवानी शेत शिवारातील नाल्याच्या काठावर गावठी मोहा दारू ची भट्टी काढण्या करिता मोहा रासायन सडवा तयार करीत आहे. अशी माहिती प्राप्त झाल्याने खबरे प्रमाणे जुनेवानी शेत शिवारात पंचासमक्ष मौक्यावर पोहोचुन पाहणी केली असता संदीप ठाकरे. देवनगर हिंगणी हा नाल्या च्या बाजूला झाडाझुडपात मोहा सडवा रसायन तयार करत असताना दिसून आला त्यास पोलीस व पंच आल्याची चाहूल लागतंच तो झाडाझुडपाचा फायदा घेत मोक्यावरून पसारा झाला.
मौक्यावरून 1) 11 मोठ्या लोखंडी ड्रम मध्ये प्रत्येकी 200 लिटर प्रमाणे एकूण 2200 लिटर गावठी मोहा दारू काढण्याचा कच्चा मोहा रासायन सडवा प्रती लिटर 200/-रुपये प्रमाणे ऐकूण 4’40,000 रुपये 2) 11 लोखंडी ड्रम प्रती ड्रम 1000 रुपये प्रमाणे एकूण 11,000 रुपये 3) इतर दारू भट्टीला लागणारे इतर साहित्य ऐकून कि. 10,000 रुपये असा एकूण 4,61,000/- रुपये चा मुद्देमाल जप्त करून पसारा आरोपी संदीप ठाकरे रा. देवनगर हिंगणी ता. सेलू जिल्हा वर्धा यांचे विरुद्ध पोलीस स्टेशन सेलू येथे दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे नोंद करण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल, अपर पोलीस अधिक्षक सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील महाडीक यांचे निर्देशाप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज वाघोडे ठाणेदार पोलीस स्टेशन सेलू, येथील गुन्हे अन्वेषण पथकातील पोलीस आमलदार अनिल केकतपुरे, रामकिसन इप्पर, गजानन कमठाणे यांनी सदरची कार्यवाही केली..



