ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सरदार पटेल महाविद्यालयात मायक्रोबायोलॉजी स्टुडंट्स क्लबचे उदघाटन व व्याख्यान संपन्न

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर येथील सरदार पटेल महाविद्यालय येथे शुक्रवार दि. ०४ सप्टेंबर २०२६ ला मायक्रोबायोलॉजी स्टुडंट्स क्लबचा उदघाटन समारंभ पार पडला.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एम. काटकर होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व उद्घाटक म्हणून डॉ. नागा मुरलीधर सायंटिस्ट व ऑफिसर इंचार्ज आय. सी. एम. आर सेन्ट्रल रिसर्च मॅनेजमेंट आणि कंट्रोल चे हिमोग्लोबिनोपॅथि तसेच डॉ. स्वप्नील चांदेकर, सायंटिस्ट – सि तसेच महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. स्वप्नील माधमशेट्टीवार, मायक्रोबायोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. व्ही. एस. वाढई तसेच विभागातील प्राध्यापिका डॉ. व्ही. यु. थुल, स्टुडंट्स क्लबची अध्यक्षा कु. प्रांजली खनके आदि उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभागप्रमुख डॉ. व्ही. एस. वाढई यांनी केले. आपल्या प्रास्ताविक भाषणातून ते म्हणाले की, स्टुडंट्स क्लब हे एक विद्यार्थ्यांनी स्वतः घडवून आणलेली संघटना आहे. या माध्यमाने विद्यार्थ्यांनी स्वतः मधील असलेले गुण व्यक्तीमत्व विकसीत करण्यामध्ये महत्त्वाचे आधार बनेल. सातत्याने मागील पंधरा वर्षापासून या क्लबच्या माध्यमाने विद्यार्थ्यांचे व्यक्तीमत्व विकसीत तर होतच आहे. सोबंतच विद्यार्थ्यांचे परीक्षा गुण वाढत आहे. आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. पी. एम. काटकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना असे मत व्यक्त केले की एक उत्कृष्ट उपक्रम असून विद्यार्थ्यांमध्ये सुक्ष्मजिव विषयाप्रति आवड निर्माण होणे. त्यांना काही नविन संशोधन करण्याची कल्पना मनात येत असते.

सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे लाभलेले डॉ. नागा मुरलीधर यांच्या हस्ते मायक्रोबायोलॉजी स्टुडंट्स क्लबचे उद्घाटन पार पडले. कार्यक्रमाच्या प्रारंभी सुक्ष्मजिवशास्त्र विषया वरील वादविवाद व मिम्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. तसेच या कार्यक्रमादरम्यान डॉ. स्वप्नील चांदेकर यांनी हिमॅटोलॉजी या विषयावर मार्गदर्शन पर व्याख्यान दिले.

विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग घेत आपल्या ज्ञानाचे व सर्जनशीलतेचे प्रदर्शन केले. या वादविवाद स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक डेव्हिड सरदार , द्वितीय क्रमांक कु. आलिया अन्सारी तसेच तिसरा लक्ष्मी बोरीकर यांनी पटकाविला तसेच मिम्स स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक कुमारी अदिती टेंभरे, द्वितीय क्रमांक मनिषा कलवल व तृतीय क्रमांक रुचिता तपासे यांनी पटकाविला. सदर कार्यक्रमादरम्यान क्लबची कार्यकारिणी गठीत करण्यात आली. सदर कार्यकारिणीमध्ये अध्यक्ष कु. प्रांजली खनके उपाध्यक्ष रोहन इंगोले, अदिती टेंभरे, सचिव -माह शेख प्रसार प्रमुख – शितल जोगी, मनसा उदतटवार सांस्कृतिक प्रमुख – मीत मोहुर्ले, मसीरा शेख, प्रदर्शन प्रमुख – इशा विलायतकर, तिस्ता वैद्य , प्रकाशन प्रमुख – अनिकेत धामनकर, साक्षी कोसे, ग्रंथालय प्रमुख – प्रीतम पॉल, श्रद्धा सोनटक्के कोषाध्यक्ष – श्रीनिधी कडालावार, तन्वी लसनसकर हे होते.

         कार्यक्रमाचे संचालन बि.एस्.सी प्रथम वर्षाची विद्यार्थिनी निधी जंबूलवार व मीत मोहुर्ले यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मायक्रोबायोलॉजी क्लब ची अध्यक्षा कुमारी. प्रांजली खनके हिने केले.

उपरोक्त उपक्रमाबद्दल सर्वोदय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आदरणीय श्री. अरविंद सावकार पोरेड्डीवार, कार्यकारी अध्यक्ष श्री. किशोरभाऊ जोरगेवार, उपाध्यक्ष श्री. सुदर्शन निमकर, उपाध्यक्ष श्रीमती सगुणाताई तलांडी, सचिव श्री. प्रशांत पोटदुखे, कोशाध्यक्ष श्री. संदिप वामनराव गड्डमवार, व सन्माननीय सदस्य श्री. राकेश पटेल, श्री. एस. रमजान, कार्यकारीणी सदस्य श्री. सुरेश पोटदुखे, सदस्य, श्री. जिनेश पटेल तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एम. काटकर, सुक्ष्मजिवशास्त्र विभाग प्रमुख डॉ. व्हि. एस. वाढई, व विभागातील इतर प्राध्यापक वृंद यांनी यशाबद्दल अभिनंदन केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये