ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

4 लाख 38 हजारावर गावठी मोहा दारूचा मुद्देमाल जप्त

वर्धा गुन्हे प्रगटिकरण पथकाची मोठी कार्यवाही

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

पोस्ट वर्धा शहर हद्दीत आज रोजी कसाई मोहल्ला पूल फैल वर्धा रेल्वे लाईन जवळील नाल्यावर गावठी मोहा दारू हातभट्टी वर छापा घातला असता 11 ड्रम मध्ये 1050 लिटर उकळता व कच्चा मोहा सोडवा रसायन, 56 लिटर गावठी मोहा दारू, इतर दारू भट्टी साहित्य असा एकूण 2,48,200/- रु चा माल जागीच नाश करण्यात आला. तसेच रेल्वे लाईन जवळील नाल्यावर गावठी मोहा दारू हातभट्टी वर छापा घातला असता 8 ड्रम मध्ये 800 लिटर उकळता व कच्चा मोहा सोडवा रसायन, 42 लिटर गावठी मोहा दारू, इतर दारू भट्टी साहित्य असा एकूण 1,90,150/- रु चा माल जागीच नाश करण्यात आला असा एकूण 4,38,350/ रु चा माल जप्त करून नाश करण्यात आला.

सदर ची कारवाई श्री सौरभकुमार अग्रवाल पोलीस अधीक्षक, श्री सदाशिव वाघमारे अप्पर पोलीस अधीक्षक, श्री सुनील महाडिक उप विभागीय पोलीस अधिकारी वर्धा, श्री नागेश कुमार चतरकर पोलीस निरीक्षक वर्धा शहर, यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रगटिकरण पथकाचे पुलिस उपनिरीक्षक शरद गायकवाड, पोलीस हवालदार राजेंद्र हाडके, पोलीस हवालदार विवेक बनसोड, अमोल ढोबळे, राजेश डाळ, चेतन दुबे, प्रवीण शिंदे आणी संतोष इघरे यांनी कार्यवाही केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये