ताज्या घडामोडी

गोवंशांना कत्तलिकरीता निर्दयतेने बांधून क्रूर वागणूक देणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

21 जातीचे (गाय, गोरे, कालवड) यांना दिले जिवदान

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दिनांक 22/07/2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखे चे पथक अवैध धंद्यावर कारवाई करणे करता पोलीस स्टेशन हिंगणघाट परिसरात पेट्रोलिंग करीत असताना मुखबिर कडून खात्रीशीर खबर मिळाली की, नासिर कुरेशी, राहणार वीर भगतसिंग वॉर्ड हिंगणघाट जिल्हा वर्धा याने गोवंश प्राण्यांना निर्दयतेने व त्याचे चारा पाण्याची कोणतीही व्यवस्था न करता दाटीवाटीने कत्तली करिता घाणमोड शेत शिवारात वाघ सावली येथील बंडू गौरकार याचे शेताचे शेजारी वडाचे झाडाखाली क्रूरतेने बांधून ठेवल्याची गोपनीय माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती. सदर माहितीची शहानिशा करून स्थानिक गुन्हे शाखा पथकाने तात्काळ घटनास्थळी छापा टाकला.

छाप्यादरम्यान २१ गोवंश जनावरे अत्यंत दयनीय अवस्थेत आढळून आली. त्यांना कोणत्याही प्रकारचा चारा किंवा पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात आले नव्हते. तसेच त्यांना अरुंद जागेत बांधून ठेवण्यात आले होते.

कत्तलीकरिता अवैध्यरित्या बांधून ठेवणारे आरोपी नामे 1) हनुमान दादाजी गौरकर, वय 55 वर्ष राहणार वाघसावली, ता. हिंगणघाट, जिल्हा वर्धा, 2) नासीर कुरेशी, रा. वीर भगतसिंग वॉर्ड हिंगणघाट (पसार) आरोपी क्रमांक 1 यास ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून 21 गोवंश एकूण जु. किं. 2,95,000/- रु* चा मुद्देमाल मौका जप्ती पंचनाम्याप्रमाणे जप्त करून दोन्ही आरोपीतांविरुद्ध पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे अप क्र. 1163/2026 कलम 5(अ), 9 महाराष्ट्र पशु संरक्षण कायदा 1976 सहकलम 11 (1), (क) (ह) प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम 1960, सहकलम 119 महाराष्ट्र पोलिस अधिनियम सहकलम 3(5) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

सदर गोवंश जनावराना सुरक्षितते करीता व चारा पाण्याची व्यवस्था करीता “श्री गौरक्षण संस्था हिंगणघाट येथे दाखल करण्यात आले आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस स्टेशन हिंगणघाट हे करीत आहे.

सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक मा. श्री. सौरभ कुमार अग्रवाल सा., अपर पोलीस अधिक्षक मा. श्री. सदाशिव वाघमारे सा., स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा चे पोलीस निरीक्षक मा.श्री. विनोद चौधरी सा यांचे निर्देशाप्रमाणे पो.उप.नि. ओमप्रकाश नागापुरे, स.फौ. खुशाल पंत राठोड, मनोज धात्रक, पो.हवा. महादेव सानप, पो.हवा. आशिष महेशगौरी, पो.हवा. दीपक जंगले., पो.अ. रितेश कुऱ्हाडकर, मंगेश आदे, विनोद कापसे, हर्षल सोनटक्के सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये