जय विनायक बिल्ड क्रॉप लिमीटेड कपनी, जे एस व्ही डेव्हलपर्स इंडिया लिमीटेड, मधील 630 गुतंवणुकदार यांना दिलासा
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
दिनांक 27/12/2011 ते दिनांक 03/08/2019 पर्यतं या कालावधी मध्ये। जय विनायक बुल्ड क्रॉप लिमीटेड कपनी रजिस्ट्रेशन नंबर 233887, विशाल कॉम्पलेक्स प्लॉट नंबर-1 प्रगती कॉलनी साई मंदीर समोर वर्धा रोड नागपूर, आणि 2. जे. एस. व्ही, डेव्हलपर्स इंडिया लिमीटेड, रजिस्ट्रेशन नंबर U45201MP2009PLC 021807 प्लॉट नंबर 225 एम पी नगर झोन-2 भोपाल मध्यप्रदेश. या कंपण्यामध्ये आर. डी. फिक्स डिपॉझीट तसेच इतर स्किममध्ये 11.50% व्याजाचे आमीष देवून कांरजा (घाडगे), आष्टी, आर्वी जिल्हा वर्धा, तसेच तालुका काटोल जि. नागपूर येथील, इतर नागरीकांनी मोठया प्रमाणात नमूद कंपन्यामध्ये रक्कम गुंतवणूक केल्यावर गुंतवणूक वेळ संपल्यावर देखील 1) जय विनायक बुल्ड क्रॉप लिमीटेड कपनी, 2) जे. एस.व्ही. डेव्हलपर्स इंडिया लिमीटेड, या कंपनी यांनी गुंतवूणकदार पिडीत यांची मोठ्या प्रमाणात गोळा केलेली रक्कम 2.05.28.340 रु.परत न करता कंपनी कार्यालये बंद करुन अपहार करुन फसवणुक केल्याने सदर बाबत आरोपी 1) विजयालक्ष्मी जगमोहन कठेत 2) अमीत कोनदेव चौधरी 3) प्रमोद कुकडे 4) देवेद्रं नागपूरे 5) दिनेश हेमराज टेंभरे, व त्यांचे इतर साथीदार विरुध्द पोलीस स्टेशन कारंजा जि. वर्धा येथे अपराध क्रंमाक 257/2019 कलम 406,409,420,120 (ब) भा.द.वो. सहकलम 3.4 एमपीआयडी अॅक्ट सहकलम 21,22,23,25 अनियमित ठेव योजना प्रतीबंध अधिनियम कायदा नुसार गुन्हा नोंद आहे.
सदर गुन्हया मधील 630 पिडीतांनी गुतवणूक केलेल्या ठेवी परत मिळणेसाठी आर्थिक गुन्हे शाखा वर्धा यांनी आरोपीत कंपनीच्या मालमत्ता जप्त होण्यासाठी एमपीआयडी कायदाप्रमाणे प्रस्ताव सादर केल्यावर गृह विभागाने महाराष्ट्र शासन राजपत्र दिनांक 25/5/2026 रोजी काढून कंपनीच्या 22 करोड रुपयाच्या मालमत्ता जप्त करुन सक्षम अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी आर्वी यांची नेमणुक केल्याने पिडीत गुंतवणूदार यांना गुंतवणूक केलेल्या ठेवी परत मिळण्यासाठी दिलासा झालेला आहे.
सदर कार्यवाही सौरभ कुमार अग्रवाल पोलीस अधिक्षक वर्धा, सदाशिव वाघमारे अपर पोलीस अधिक्षक वर्धा, पुंडलीक भटकर, पोलीस उप-अधिक्षक आर्थिक गुन्हे शाखा वर्धा यांचे मार्गदशनात आर्थिक गुन्हे शाखा वर्धा यांनी कार्यवाही केली.



