सयोग बिल्डर अँन्ड रिअल इस्टेट प्रा.लि. या कंपनी मधील 417 गुतंवणुकदार यांना दिलासा
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
दिनांक 21/03/2011 ते दिनांक 03/01/2017 पर्यतं या कालावधी मध्ये सयोग बिल्डर अॅन्ड रिअल इस्टेट प्रा.लि. रजिस्ट्रेशन नंबर U70102MH2009PTC194874 तिरुपती अपार्टमेंट एच नं.1-24-37 बिसेन नगर न्यू मोंढा नांदेड या कंपनीमध्ये आर डी., फिक्स डिपॉझीट तसेच इतर स्किममध्ये 12% व्याजाचे आमीष देवून वर्धा जिल्हयातील नागरीकांनी मोठ्या प्रमाणात नमुद कंपनीमध्ये रक्कम गुंतवणूक केल्यावर गुंतवणूक वेळ संपल्यावर देखील सयोग बिल्डर अँन्ड रिअल इस्टेट प्रा.लि. या कंपनीने गुंतवूणकदार पिडीत यांची मोठ्या प्रमाणात गोळा केलेली रक्कम 56,55,544 /- रु परत न करता कंपनी कार्यालय बंद करुन अपहार करुन फसवणुक केल्याने आरोपी 1) सुरेंद्रप्रसाद शंकर विश्वकर्मा 2) सौ. हेमलता सुरेंद्रप्रसाद विश्वकर्मा 3) सुनिल निवृत्ती जाधव 4) सोपान नामदेव खंडारे यांचे विरुध्द पोलीस स्टेशन वर्धा शहर जि. वर्धा येथे अपराध क्रंमाक 18/2017 कलम 420,504,506,120 (ब) भा.द.वी. सहकलम 3. 4,8 एम.पी.आय.डी. अॅक्ट नुसार गुन्हा नोंद आहे.
सदर गुन्हया मधील 417 पिडीतांनी गुंतवणूक केलेल्या ठेवी परत मिळणेसाठी आर्थिक गुन्हे शाखा वर्धा यांनी आरोपीत कंपनीच्या मालमत्ता जप्त होण्यासाठी एम.पी.आय.डी. कायदाप्रमाणे प्रस्ताव सादर केल्यावर गृह विभागाने महाराष्ट्र शासन राजपत्र दिनांक 12/5/2026 रोजी काढुन कंपनीच्या 52,73,222/- रुपयाच्या मालमत्ता जप्त करुन सक्षम अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी वर्धा यांची नेमणुक केल्याने पिडीत गुंतवणूदार यांना गुंतवणूक केलेल्या ठेवी परत मिळण्यासाठी दिलासा झालेला आहे.u
सदर कार्यवाही सौरभ कुमार अग्रवाल पोलीस अधिक्षक वर्धा, सदाशिव वाघमारे अपर पोलीस अधिक्षक वर्धा, पुंडलीक भटकर, पोलीस उपअधिक्षक आर्थिक गुन्हे शाखा वर्धा यांचे मार्गदशनात आर्थिक गुन्हे शाखा वर्धा यांनी कार्यवाही केली.



