ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपचे अधिकृत उमेदवार अरुण लखाणी यांनी घेतले माता महाकालीचे दर्शन

महाकाली मातेची मूर्ती देत आमदार किशोर जोरगेवार यांनी केले स्वागत

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर :_ महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक-२०२६ अंतर्गत वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाने अरुण लखाणी यांची अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा केली असून, उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांचे आज चंद्रपुरात आगमन झाले. यावेळी भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थकांनी त्यांचे उत्साहपूर्ण स्वागत केले. आमदार किशोर जोरगेवार यांनीही माता महाकालीची मूर्ती देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी राज्यमंत्री तथा निवडणूक प्रमुख पंकज भोयर यांचीही उपस्थिती होती. त्यांचेही आमदार किशोर जोरगेवार यांनी माता महाकालीची मूर्ती देऊन स्वागत केले.

चंद्रपूर दौऱ्यादरम्यान अरुण लखाणी यांनी पालकमंत्री डॉ. प्रा. अशोक उईके, आमदार किशोर जोरगेवार आणि आमदार देवराव भोंगळे यांच्या समवेत चंद्रपूरची आराध्य दैवत असलेल्या श्री माता महाकाली मंदिरात जाऊन दर्शन घेतले व राज्याच्या प्रगतीसह मतदारसंघाच्या विकासासाठी प्रार्थना केली.

यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी अरुण लखाणी यांच्या उमेदवारीचे स्वागत करताना भाजप संघटनेच्या बळावर आणि कार्यकर्त्यांच्या मेहनतीच्या जोरावर या निवडणुकीत मोठा विजय मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. स्थानिक स्वराज्य संस्था प्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने तयारीला वेग दिल्याचे दिसून आले.

अरुण लखाणी यांनीही पक्षाने दिलेल्या संधीबद्दल केंद्रीय व राज्य नेतृत्वाचे आभार मानले. वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली या तीन जिल्ह्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रश्नांना प्राधान्य देत विकासाभिमुख राजकारण करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये