ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बोऱ धरण जलाशयातील मत्स्यव्यवसायात अनियमितता

योग्य दरात काम देण्याची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

सेलू : बहुजन समाज पार्टी, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री. ऍड. सुनील जी डोंगरे साहेब व वर्धा जिल्हाध्यक्ष अनोमदर्शी भैसारे साहेब लोकसभा इन्चार्ज प्रज्ञा ताई दुपट्टे महिला विंग च्या अध्यक्ष मंदा ताई नाखले तसेच सेलू विधानसभा आणी तालुक्यातील सर्व पदाधिकारी यांच्या उपस्तितीत तहसीलदार, सेलू शकुंतला पाराजे यांना निवेदन देऊन बोऱ धरण जलाशयातील मत्स्यव्यवसायाच्या कंत्राटाबाबत योग्य दरात काम देण्याची मागणी केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, स्वस्त दरात कंत्राट घेणाऱ्या काही कंत्राटदारांकडून जलाशय परिसरातील हिंगणी, बोरधरण तसेच हिंगणा तालुक्यातील अडेगाव मालापूर गिद मगड गावांमध्ये मासेमार तसेच नागरिकांना त्रास दिला जात असल्याच्या तक्रारी आहेत. तसेच बोऱ धरणातील मासेमारीचे काम करताना काही ठेकेदारांकडून नियमांचे पालन केले जात नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

यामुळे स्थानिक मासेमारांचे आर्थिक नुकसान होत असून त्यांच्या उपजीविकेवर परिणाम होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच जलाशयातील मत्स्यसंपत्तीचे संवर्धन आणि स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी योग्य दरात आणि पारदर्शक पद्धतीने कंत्राट देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

बहुजन समाज पार्टीने प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी करून संबंधित बाबींवर तातडीने कार्यवाही करावी, तसेच मत्स्यव्यवसायाचे कंत्राट देताना स्थानिक हिताला प्राधान्य द्यावे, अशी मागणी केली आहे.

यावेळी बहुजन समाज पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष. श्री. सुनील जी डोंगरे साहेब वर्धा जिल्हाध्यक्ष अनोमदर्शी भैसारे सेलू विधानसभा प्रभारी अरुण शंभरकर, विधानसभा प्रभारी विशाल रंगारी मलिंद शंभरकर, महिला सेलू विधानसभा च्या महिला प्रभारी अनिता ताई पारसे बी. व्ही. एफ. संयोजक शंकर पानबुडे मधुकर सोनटक्के, किशोर खोब्रागडे मासेमारी हिंगणी चे संघटक राकेश डायरे, चिंतामण मांढरे, राजेश पारसे,तसेच हिंगना तालुक्यातील अडेगाव रामाजी मारबाते, अनिल शिंदे, गणेश डमरे, भीमराव मारबाते असे खुप मोठ्या संख्येने मासेमार महिला पुरुष यांच्या उपस्थिती मध्ये यांनी हे निवेदन तहसीलदार, शकुंतला पाराजे सेलू यांच्याकडे सादर केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये