ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

५९६६८ मतदारांची नावे कमी होण्याची शक्यता

३१ मे पूर्वी मॅपिंग न झालेल्या मतदारांनी नावे व पुरावे सादर करावे : उपविभागीय अधिकारी संदीप भस्के

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

          मा. भारत निवडणूक आयोगाने १४ मे २०२६ च्या आदेशान्वये महाराष्ट्रात विशेष सखोल पुनर्निरीक्षण (S. I .R ) कार्यक्रम घोषित केला आहे.त्याअनुषंगाने वरोरा भद्रावती मतदार संघातील ८० टक्के मतदारांचे मॅपिंग पूर्णत्वास आले असले तरीही २० टक्के मतदारांचे मॅपिंग अजूनही योग्य नावे व पुराव्याअभावी अपूर्ण राहिलेले आहे.

३१ मे २०२६ पूर्वी सदर मतदारांनी आपली नावे व पुरावे सादर न केल्यास वरोरा भद्रावती मतदार क्षेत्रातील एकूण २८७४१३ मतदारांपैकी ५९६६८मतदारांचे नावे वगळली जाऊ शकतात असे प्रसिद्धी माध्यमातून कळविण्यात येत आहे.

तरी ज्या मतदारांचे २००५ च्या मतदार यादी सोबत मॅपिंग करण्यात आले नाही अशा मतदारांची मतदान केंद्र निहाय यादी तयार करण्यात आली असून सदर यादी डाउनलोड करण्यासाठी QR कोड तयार करण्यात आला आहे.QR कोड स्कॅन करून किंवा https//drive.google com./drive/ Folders/1lod 7s Ga S19 a REW rs Sidco F ad 854 m 355J? USP=drive link ही लिंक वापरून मतदारांनी मॅपिंग न झालेल्या यादी मध्ये आपले नाव समाविष्ट असेल तर सबंधित केंद्र स्तरीय अधिकारी (BLO) शी संपर्क साधावा. अथवा QR कोड स्कॅन करून आपल्या नावाची शहानिशा करावी.

 भद्रावती वरोरा मतदार संघातील मतदारांनी आपल्या नावाची मॅपिंग पूर्ण झाल्याची खातरजमा करून घ्यावी.

 २००५ च्या मतदार यादी सोबत मॅपिंग पूर्ण न झाल्याचे निदर्शनास आल्यास सबंधित BLO शी संपर्क साधावा. तसेच सोबत दिलेला QR कोड स्कॅन करून मॅपिंग झाल्याची शहानिशा करून घ्यावी.

 *संदीप भस्के.. उपविभागीय अधिकारी वरोरा*

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये