ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वर्धा जिल्हा पोलीस दलातर्फे “दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिन” निमित्त सामूहिक शपथ ग्रहण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

भारताचे माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त २१ मे हा दिवस संपूर्ण देशभरात “दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवस” म्हणून पाळण्यात येतो. याच पार्श्वभूमीवर आज, दिनांक २१ मे २०२६ रोजी सकाळी ठीक ११:०० वाजता वर्धा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने विविध पोलीस कार्यालये आणि पोलीस ठाण्यांमध्ये दहशतवाद व हिंसाचार विरोधी शपथ घेण्यात आली. पोलीस अधीक्षक कार्यालय, वर्धा येथे आयोजित मुख्य कार्यक्रमात सर्व शाखाप्रमुख, पोलीस अधिकारी आणि अंमलदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित सर्वांनी देशाची अहिंसा आणि सहिष्णुतेची परंपरा जोपासण्याची आणि सर्व प्रकारच्या दहशतवादाचा व हिंसाचाराचा संघटितपणे मुकाबला करण्याची गंभीरपूर्वक प्रतिज्ञा घेतली.

वर्धा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासोबतच जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, सर्व पोलीस स्टेशन (ठाणेदार) व त्यांच्या अधीनस्थ असलेल्या सर्व पोलीस अधिकारी व अंमलदारांनी आपापल्या पोलीस ठाण्याच्या आवारात एकत्र येऊन ही शपथ घेतली

या उपक्रमाचे नियोजन पोलीस अधीक्षक कार्यालय वर्धा येथील मानव संसाधन (कल्याण) शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष चिलांगे व त्यांच्या पथकाने केले. समाजात शांतता, सुव्यवस्था आणि सलोखा राखण्यासाठी पोलीस दल सदैव कटिबद्ध असल्याचा संदेश या निमित्ताने देण्यात आला.

 (आशिष चिलोगे) सहायक जनसंपर्क अधिकारी, पोलिस अधीक्षक कार्यालय वर्धा,

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये