ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महानगरपालिकेमार्फत मोकाट जनावरे व मोकाट श्वान पकडण्याची धडक मोहीम सुरू

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर : शहरातील नागरिकांची सुरक्षितता, वाहतूक व्यवस्थेची सुरळीतता आणि सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत मोकाट जनावरे व मोकाट श्वान पकडण्याची विशेष धडक मोहीम सुरू करण्यात आली आहे.

महानगरपालिका आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित विभागाच्या पथकांकडून शहरातील विविध भागांत दररोज मोकाट जनावरे व मोकाट श्वान पकडण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. रस्त्यांवर मोकाट फिरणाऱ्या जनावरांमुळे अपघात, वाहतूक कोंडी तसेच नागरिकांना होणारा त्रास टाळण्यासाठी ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.

महानगरपालिका नागरिकांना आवाहन करते की, पाळीव जनावरे रस्त्यावर मोकाट सोडू नयेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध लागू नियमांनुसार कारवाई करण्यात येईल. तसेच शहरात मोकाट जनावरे किंवा मोकाट श्वान आढळल्यास त्याची माहिती महानगरपालिकेला द्यावी, जेणेकरून संबंधित पथक तात्काळ आवश्यक कार्यवाही करू शकेल.

चंद्रपूर शहर स्वच्छ, सुरक्षित व अपघातमुक्त ठेवण्यासाठी सर्व नागरिकांनी महानगरपालिकेच्या या मोहिमेस सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये