ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

श्यामाप्रसाद मुखर्जी जयंतीनिमित्त भाजपा पोंभूर्णा तालुक्याच्या वतीने अभिवादन व वृक्षारोपण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. विजय वासेकर

पोंभूर्णा : भारतीय जनसंघाचे संस्थापक, प्रखर राष्ट्रवादी नेते डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी पोंभूर्णा तालुक्याच्या वतीने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. यानिमित्त पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वृक्षारोपणाचा कार्यक्रमही उत्साहात पार पडला.

हा कार्यक्रम राज्याचे माजी मंत्री तथा बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच भाजपा जिल्हाध्यक्ष मा. हरीश भैय्या शर्मा यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आला.

यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या राष्ट्रनिष्ठ विचारांचे स्मरण करून त्यांच्या कार्याचा आदर्श घेण्याचा संकल्प व्यक्त केला. तसेच त्यांच्या राष्ट्रएकात्मतेच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा निर्धारही करण्यात आला.

या कार्यक्रमात भाजपा तालुका अध्यक्ष, मंडळ पदाधिकारी, शक्ती केंद्र प्रमुख, बूथ अध्यक्ष, विविध मोर्चांचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी भाजपा पोंभूर्णा तालुक्याचे तालुका अध्यक्ष हरीश ढवस यांच्या नेतृत्वाखाली सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये