ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

स्व. दत्तात्रय वासाडे स्मृतिप्रीत्यर्थ रक्तदान शिबिर

धनोजे समाज मंदिर लक्ष्मीनगर व डॉ. अनुप वासाडे यांचा स्तुत्य उपक्रम ;150 रक्तदात्याने केले रक्तदान

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर : धनोजे कुणबी समाज मंदिर, लक्ष्मीनगर, वडगाव व डॉ. अनुप वासाडे यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. डॉक्टर दत्तात्रय भाऊजी वासाडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित

रक्तदान शिबिर उत्साहपूर्ण वातावरणात स्थानिक धनोजे कुणबी समाज मंदिर, लक्ष्मीनगर येथे उत्साहात पार पडले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धनोजे कुणबी समाज मंदिराचे अध्यक्ष श्रीधर मालेकर होते. स्थानिक रक्त संक्रमण अधिकारी गितेश धोबे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून चंद्रकांत गोहोकार, धनोजे कुणबी समाज केंद्रीय समितीचे अध्यक्ष संजय ढवस, सल्लागार मनोहर पाहुणकर, धनोजे कुणबी समाज मंडळाचे सचिव अतुल देऊळकर, सहसचिव प्रा. नामदेव मोरे, माजी कृषी अधिकारी नामदेव वांढरे, चंद्रकांत वासाडे, डॉ. प्रभाताई वासाडे, डॉ. शुभांगी वासाडे, डॉ. अनुप वासाडे उपस्थित होते.

        मान्यवरांनी स्व. दत्तात्रय भाऊजी वासाडे यांच्या सामाजिक कार्याचा गौरव करत रक्तदान हे सर्वोत्तम मानवसेवेचे कार्य असल्याचे सांगितले. रक्तदानामुळे अनेक गरजू रुग्णांना नवजीवन मिळते, त्यामुळे समाजातील प्रत्येक निरोगी नागरिकाने नियमित रक्तदान करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

या शिबिरात समाजबांधव व युवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत १५० दात्यानी रक्तदान केले. उपस्थित मान्यवरांनी आयोजकांचे अभिनंदन करून अशा सामाजिक उपक्रमांचे सातत्याने आयोजन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

कार्यक्रमाचे संचालन प्रा. नामदेव मोरे तर आभार आभारप्रदर्शन संध्या गोहोकार यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी धनंजय युवा आघाडीचे अध्यक्ष नितीन देवकर विपीना देऊळकर, सचिव पृथ्वीराज धानोरकर, उपाध्यक्ष श्याम बोबडे, सचिन उपरे नकूल देऊळकर, सोनल वासाडे, संध्या मुसळे, अमोल मोरे यांनी प्रयत्न केले. यावेळी समाजातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये