तलवार बाळगून दहशत माजविणाऱ्या युवकास अटक
भद्रावती गुन्हे शोध पथकाची कार्यवाही

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भद्रावती पोलिस स्टेशन अंतर्गत शहरातील दुधाळा तलाव किल्ला वॉर्ड भद्रावती परिसरात दि.१८ रोजी रात्री ८.००वाजेच्या दरम्यान हातात लोखंडी धारदार तलवार बाळगून एक युवक दहशत निर्माण करीत असल्याची खबर मुखबिराकडून भद्रावती पोलीस स्टेशन ला प्राप्त झाली.
घटनेचे गांभीर्य ओळखुन स्थानिक पोलिसांनी तात्काळ कार्यवाही करीत आरोपी नामे रितीक संतोष रामटेके वय.२६ रा. आंबेडकर चौक भद्रावती यास पंचासमक्ष अटक केली.
पो.हवा गोपाल आतकुलवार/२५७९ यांचे फिर्यादीवरून अपराध क्र.५८४/२०२६ कलम,४-२५ भा. न्या. हत्यार कायदा अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली.
सदर आरोपीकडून स्टील ची मूठ असलेली धारदार लोखंडी पाते असलेली तलवार ज्याची किंमत अंदाजे ५००० रुपये हस्तगत करण्यात आली.
स्थानिक पोलिसांच्या तत्पर कार्यवाही मुळे पुढील अनर्थ टळल्याने स्थानिक रहिवाश्यांनी सुटकेचा निःश्वास घेतला.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल, पोलिस निरीक्षक योगेश्वर पारधीपोलिस स्टेशन भद्रावती यांचे मार्गदर्शनात गुन्हे शोध पथक पोउपनि गजानन तुपकर, महेंद्र बेसरकर, गोपाल आतकुलवार, अनुप आस्टूनकर, जगदीश झाडे, विश्वनाथ चुदरी, योगेश घाटोळे, खुशाल कावळे, संतोष राठोड, यांनी पार पाडली.



