ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भद्रावती पोलिसांची धड़ाकेबाज कार्यवाही

मुद्देमालासह आरोपीला केली अटकेत

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

         स्थानिक पोलिस स्टेशन अंतर्गत संताजी नगर येथील फिर्यादी प्रफुल पांडुरंग निगोट वय.३१ हे दि.१४ रोजी रात्री रहात असलेल्या भाड्याच्या घरी आले असता नेहमीप्रमाणे आपले वाहन Hero HF Deluxe क्रमांक.एम.एच.३४,CB ९९३५ अंगणात नियोजित जागेवर ठेवले.

मात्र दि.१५ च्या सकाळी सदर वाहन आपल्या नियोजित जागेवर नसल्याचे लक्षात आले असता त्यांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र वाहन कुठेच आढळून न आल्याने त्यांनी त्वरित स्थानिक पोलिस गाठत वाहन चोरीस गेल्याची तक्रार दाखल केली. अपराध क्र.५७६/२०२६ कलम ३०३,(२) भा. न्या. संहिता अन्वये गुन्ह्याची नोंद करून तपासाची सूत्रे हलविली असता मुखबीर द्वारे मिळालेल्या खबरीनुसार आरोपी नामे यमला तंगराज कोरवन वय.४०, व नामे गोपाल जिवन मालाकार वय,३० रा. शाम नगर बंगाली कॅम्प चंद्रपूर या आरोपींना मुद्देमालासह अल्प कालावधीत अटक करण्यात आली.

सदर आरोपी कडून चोरीस गेलेले वाहन अंदाजे किंमत ५०,००० रुपये तसेच अंगझडती घेतली असता अपराध क्र.५८०/२०२६ कलम ३३१,(४) ३०५,३,(५) मधील एकूण २०,००० रु. किमतीचा माल जप्त करण्यात आला.

सदरची कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक आयुष नोपानी , अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, वरोरा उपविभागीय अधिकारी संतोष बाकल, भद्रावती पोलिस निरीक्षक योगेश्वर पारधी यांचे मार्गदर्शनात गुन्हे शोध पथक भद्रावती  पोउपनि गजानन तुपकर, महेंद्र बेसरकर, गोपाल आतकुलवार, अनुप आस्टूनकर, जगदीश झाडे, विश्वनाथ चुदरी, योगेश घाटोळे, खुशाल कावळे, संतोष राठोड यांनी पार पाडली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये