ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

डॉ ज्ञानेश हटवार यांच्या “ग्रामगीतेतील क्रांतिदर्शित्व” या पुस्तकाला राज्य स्तरीय पुरस्कार जाहीर….

मराठी ग्रंथ संग्रहालय ठाणेचे राज्यस्तरीय "श्रीस्थानक साहित्य पुरस्कार"

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

       साहित्यिकांच्या लेखणीला प्रेरणा मिळावी या उदात्त हेतूने मराठी ग्रंथ संग्रहालय ठाणे मार्फत दरवर्षी साहित्यिकांच्या विविध प्रकारच्या साहित्यकृतीला पुरस्कार प्रदान केला जातो. यावर्षीचा प्रतिष्ठेचा “श्रीस्थानक साहित्य पुरस्कार” भद्रावती येथील साहित्यिक प्रा. डॉ ज्ञानेश हटवार यांच्या “ग्रामगीतेतील क्रांतिदर्शित्व” या साहित्य कृतीला जाहिर झाला आहे.

डॉ ज्ञानेश हटवार यांचा “ग्रामगीतेतील क्रांतिदर्शित्व’ हा ग्रंथ वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामीन विकासाचे सूत्र असलेल्या ग्रामगीता ग्रंथावरती लिहिलेला आहे. या ग्रंथात वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेतील विचारांची समाजातील प्रत्येक घटकाला आजच्या धावपळीच्या जीवनात कशी आवश्यकता आहे. राष्ट्रसंतांचे विचार कसे पुरोगामी , विज्ञाननिष्ठ, विवेकनिष्ठ, समाजजीवनाच्या उन्नतीसाठी अत्यावश्यक आहेत, याचा उहापोह या ग्रंथात केला आहे.

मराठी ग्रंथ संग्रहालय ठाणे यांच्या वतीने या पुस्तकाची दखल घेऊन या पुस्तकाला पुरस्कार जाहीर करण्यात आला. या पुरस्कार वितरणाचे हे आठवे वर्ष आहे. विविध प्रकारच्या वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या १५ साहित्य प्रकाराला हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत असतो. सदर पुरस्कार हा मराठी ग्रंथ संग्रहालय ठाणे येथे मान्यवर थोर साहित्यिक मंडळींच्या हस्ते दि २५ आक्टोबर २०२६ ला प्रदान करण्यात येणार आहे.

डॉ. ज्ञानेश हटवार यांच्या “ग्रामगीतेतील क्रांतिदर्शित्व” या पुस्तकाला हा राज्य स्तरीय पुरस्कार “अभिजात मराठी भाषा गौरव सप्ताहात” जाहिर झाल्याने जेष्ठ साहित्यिक, समीक्षक प्राचार्य डॉ श्याम मोहरकर, जेष्ठ साहित्यिक श्रीमती प्रतिमा इंगोले, सौ विनाताई मोहरकर, डॉ. सविता सादमवार, मराठी विभाग प्रमुख गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली, डॉ. विवेक शिंदे अध्यक्ष भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती, डॉ कार्तिक शिंदे सचिव, डॉ विशाल शिंदे सहसचिव, श्रीमती नीलिमाताई शिंदे, डॉ जयंत वानखेडे, विश्वस्त भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती, डॉ परमानंद बावनकुळे, डॉ राम वासेकर, प्राचार्य डॉ सुधीर मोते, प्रकाशक पराग लोणकर पुणे, डॉ विठ्ठल चौथाले गडचिरोली, डॉ पांडुरंग कंद पुणे, प्रा. बाळासाहेब माने मुंबई, प्रा. यश पवार यवतमाळ, डॉ. शालिनीताई तेलरांधे नागपूर, पवन कटरे गोंदिया, संजय लेनगुरे भंडारा, प्राचार्य सुभाष पारिसे, प्रा. अरूण मेश्राम, प्रा. ओमप्रकाश ढोरे अमरावती, नामदेव मोरे चंद्रपूर, विदर्भ साहित्य संघाचे पदाधिकारी, झाडीबोली साहित्य मंडळाचे पदाधिकारी, गुरुदेव सेवा मंडळाचे पदाधिकारी भद्रावती तसेच साहित्यिक, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील विविध मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये