ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कारंजा शहरात जीवन सुरक्षा अभियान अंतर्गत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 132 वाहन चालकावर धडक कारवाई

2 लाख 17 हजारावर दंड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

 दिनांक 10/10/26 रोजी मा.पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल वर्धा, मा.अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे वर्धा यांच्या मार्गदर्शनाखाली जीवन सुरक्षा अभियान संपूर्ण जिल्हाभरात राबविण्यात येत असून मा. प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.वंदना कारखेले आर्वी, ठाणेदार पोलीस स्टेशन प्रल्हाद मदन,जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखा प्रभारी विजयकुमार घुले, जिल्हा वाहतूक शाखा स्टाफ व पोलीस स्टेशनच्या स्टाफ psi जायभाये,psi मदनकार यांनी शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी तसेच वाहन चालक व पादचा-यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तसेच अपघात रोखण्यासाठी रस्तावर वाहतूकीस अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने उभी केलेल्या वाहनावर जीवन सुरक्षा अभियान राबवून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकावर कारवाई करण्यात आली या कारवाई वाहन चालक विरुद्ध मोटार वाहन अधिनियम1988 ट्रिपल सिट, लायसन्स न बाळगणारे अल्पवयीन मुले व गाडी मालकावर, व इतर कलमान्वये एकूण 132 केसेस व 2,17,650/-दंड करण्यात आला आहे. सदर मोहीम अंतर्गत केलेली कारवाई ही लोकांमध्ये वाहतूक नियमांची जागृती करणे तसेच नियमांचे पालन करणे यासाठी आहे.

वाहनचालकांनी आपले वाहन रस्तावर आडवे दुतर्फा किंवा वाहतूकीच्या प्रवासाला अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने वाहन उभे करु नये विशेषतः (1)रस्ताच्या मधोमध किंवा वाहतूकीच्या मार्गात वाहन उभे करु नये(2) चौक वळण अरुंद रस्ता बसथांबा व गर्दीच्या ठिकाणी अनाधिकृत पार्किंग करु नये(3) ईतर वाहनांना जाण्या-येण्यासाठी अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने वाहन पार्क करु नये (4) शक्यतो निर्धारित पार्किंग च्या ठिकाणी वाहन उभे करावे (5) वाहन थांबविताना पादचारी व इतर वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा विचार करावा(6) वाहतूकीस अडथळा निर्माण झाल्यास आपत्कालीन वाहने रुग्णवाहिका, अग्निशमन वाहने यांना मार्ग मिळण्यास अडचण निर्माण होऊ शकते याची जाणीव ठेवावी रस्ता हा सर्व नागरिकांच्या वापरासाठी असून प्रत्येक वाहनचालकांने वाहतूकीचे नियम पाळणे ही आपली जबाबदारी आहे माझे वाहन काही मिनिटांसाठी उभे आहे या कारणामुळे रस्तावर अडथळा निर्माण करणे योग्य नाही.

वाहतूक सुरळीत सुरक्षित आणि अपघात मुक्त ठेवण्यासाठी नागरिकांनी वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे आणि योग्य ठिकाणी पार्किंग सुरक्षित वाहतूक हा संदेश आचरणात आणावा. वाहतूक नियमांचे पालन करा. रस्ता सुरळीत ठेवा आणि स्वत:सह इतरांचा जीव सुरक्षित ठेवा. जीवन सुरक्षा अभियान सर्व जिल्हाभर प्रभावीपणे राबविण्यात येणार आहेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये