ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पोलीस अधीक्षक श्री सौरभ कुमार अग्रवाल यांचे पुलगाव पोलीस स्टेशनचे वार्षिक निरीक्षण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री सौरभ कुमार अग्रवाल यांनी पुलगाव पोलीस स्टेशनचे नुकतेच वार्षिक निरीक्षण घेऊन पोलीस ठाण्यातील दफ्तर तपासणी व अभिलेख तपासले, पोलिस स्टेशन परिसराची पाहणी केली तसेच येणाऱ्या सण उत्सवादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा आढावा, वाहतूक व्यवस्थेचा आढावा घेऊन उपविभागीय पोलिस अधिकारी व ठाणेदर पुलगाव यांना योग्य सूचना दिल्या. या निरीक्षण दरम्यान त्यांनी पोलिस स्टेशन हद्दीतील व्यापारी, प्रतिष्ठित नागरिक, महिला दक्षता समिति, शांतता कमिटी, पोलिस पाटील यांच्या बैठका घेऊन त्यांच्याशी चर्चा केल्या तसेच पोलीस अधिकारी, अंमलदार व त्यांच्या कुटुंबियांसोबत संवाद साधून त्यांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेतल्या.

१. स्थानिक व्यापाऱ्यांसोबत विशेष बैठक

मा. पोलीस अधीक्षक यांनी पोलिस स्टेशन पुलगाव येथे वार्षिक निरीक्षण दरम्यान परिसरातील स्थानिक व्यापाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत व्यापाऱ्यांच्या सुरक्षेबाबत, बाजारपेठेतील वाहतूक कोंडी, सीसीटीव्ही यंत्रणा आणि चोरी-गुन्हेगारी रोखण्या संदर्भातील अडी-अडचणी व समस्या जाणून घेतल्या, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी व्यापारी आणि पोलीस प्रशासन यांनी परस्परांच्या समन्वयाने काम करावे, असे सांगत व्यापाऱ्यांच्या समस्या सोडविण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

२. प्रतिष्ठित नागरिक व महिला दक्षता समिती सोबत आढावा बैठकः

निरीक्षण दरम्यान मा. पोलीस अधीक्षक यांनी स्थानिक प्रतिष्ठित नागरिक व महिला दक्षता समितीची विशेष बैठक घेतली. यामध्ये नागरिकांनी त्यांच्या सांगितलेल्या समस्यांचे निराकरण केले तसेच महिलांच्या सुरक्षे संबंधित विविध मुद्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. महिला व मुलींच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध असल्याचे सांगत त्यांनी उपस्थित महिलांना ‘डायल ११२’ आणि वुमन हेल्पलाईन क्रमांकाबाबत सविस्तर माहिती दिली. कोणत्याही अडचणीच्या किंवा आपत्कालीन प्रसंगी महिलांनी न घाबरता या क्रमांकांचा वापर करावा, असे आवाहन त्यानी केले.

३ पोलिस पाटील बैठकः पोलिस स्टेशन हद्दीतील एकूण ५६ गावातील पोलिस पाटलांची बैठक घेऊन त्यांच्या कडून प्रत्येक गावातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला व सन उत्सवादरम्यान विशेष खबरदारी घेऊन कोणत्याही गावात अवैध धंदे , अवैध कृत्ये चालणार नाही या संबंधाने स्पष्ट सूचना दिल्या, असे कोणतेही कृत्य आढळून आल्यास तात्काळ पोलिसांना माहिती देणे व सहकार्य करणे इत्यादि सूचना दिल्या.

३. पोलीस अधिकारी, अंमलदार व त्यांच्या कुटुंबियांसोबत संवाद :

संवादात पोलीस अंमलदारांच्या कौटुंबिक व निवासी परिसरातील समस्या समजून घेण्यासाठी मा. पोलीस अधीक्षक यांनी पोलिस वसाहत याची पाहणी केली व पोलीस फॅमिली’ बैठकीचे आयोजन केले. या बैठकीत पोलीस कुटुंबीयांनी आपल्या विविध अडी-अडचणी मांडल्या. मा. पोलीस अधीक्षक यांनी सर्वांच्या समस्या आदरपूर्वक ऐकून घेत त्या प्राधान्याने व वेळेत सोडवण्याचे ठोस आश्वासन दिले.

प्रमुख अधिकाऱ्याऱ्यांची उपस्थितीः या महत्त्वपूर्ण बैठकीत श्री सौरभ कुमार अग्रवाल, पोलीस अधीक्षक, वर्धा, श्रीमती वंदना कारखेले, उपविभागीय पोलीस अधिकारी पुलगाव, श्री सदाशिव ढाकणे पोलिस निरीक्षक पुलगाव, श्री आशिष चिलांगे, वाचक, पोलिस अधीक्षक कार्यालय, वर्धा व पुलगाव पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी, अंमलदार तसेच स्थानिक नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये