ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सेलू हिंगणी रोड वरील गड्डे ठरत आहे जीवघेणे

गड्डे बुजवा गड्डे शिवसैनिकांचा एल्गार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

 दिनांक 18 मे 2026 रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास घोराड हिंगणी रोडवर अपघात घडला या अपघातामध्ये एक व्हॅगनार गाडी ज्यामध्ये कुटुंब होते हिंगणी घोराड रोडवर अनावश्यक तयार झालेल्या खड्ड्यामुळे गाडीचा वेग कमी करण्यात आला मागील गाडी कॅम्पर अनोळखी रस्ता असल्यामुळे डायरेक्ट धडक देण्यात आले साधारणतः 50 ते 60 फूट गाडी एका झुडपामध्ये जाऊन अडकली त्या गाडीमध्ये आठ दिवसीय मुलगी बाळ होते व इतर कुटुंबीय होते. नशिबाला जोर देत गाडीतील कुटुंबांना कुठल्या प्रकारची जीवहानी झाली नाही पण यावर सकारात्मक पद्धतीने विचार विनिमय करून त्या खड्ड्यांचे विल्हेवाट केले नाही तर जीव हानी झाल्याशिवाय राहणार नाही करिता शिवसेना शिंदे गटातर्फे सार्वजनिक बांधकाम विभाग सेलू यांना निवेदन सादर करण्यात आले.

निवेदनामध्ये वैशिष्ट्य असे की तात्काळ या खड्ड्यांचा विल्हेवाट करण्यास यावे अन्यथा शिवसेना शिंदे गट आक्रमक भूमिकेमध्ये आंदोलन करेल या निवेदनाच्या दरम्यान शिवसेना शिंदे गटाचे वर्धा विधानसभा संघटक रोशन राऊत शिवसेना सेलू तालुकाप्रमुख रोशन कोंबे शिवसेना ओबीसी सेल तालुकाप्रमुख प्रदीप सोडे जिल्हा परिषद सर्कल प्रमुख पप्पू कांबळे सेलू तालुका प्रसिद्धीप्रमुख वंश नाईक शिवसेना अनुसूचित जाती प्रवर्ग जिल्हा कार्यकारणी सदस्य अमन लोहकरे व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यामध्ये संबंधित अधिकारी यांनी तात्काळ दोन दिवसात त्या खड्ड्यांचे पाहणी करून त्याची विल्हेवाट करून देण्याचे आश्वासन देण्यात आले त्याकरिता शिवसेना शिंदे गटातर्फे आभार मानण्यात आले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये