ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या भिडेंविरोधात कॉग्रेस कार्यकर्ते आक्रमक

ब्रम्हपुरी कॉग्रेसच्या वतीने संभाजी भिडेंच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार

अमरावती जिल्ह्यातील बडनेरा येथील एका कार्यक्रमात मनोहर उर्फ संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्याबद्दल अत्यंत अवमानकारक विधान करून त्यांचा अपमान केला आहे.

संभाजी भिडे सारखी व्यक्ती राष्ट्रपित्याबद्दल टीकाटिप्पणी करतो ही गोष्ट संपूर्ण देशासाठी लाजिरवाणी आहे. सर्वधर्मसमभाव ही आपल्या देशाची खरी ओळख आहे, पण ही ओळख पुसण्याचा संभाजी भिडे सारख्या मनुवादी प्रवृत्तीचा प्रयत्न आहे.

असा आरोप करीत ब्रम्हपूरी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने ब्रम्हपुरी येथील शिवाजी महाराज चौकात भिडेंविरोधात घोषणाबाजी करीत भिडेंच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी भिडेंच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. या वेळी कॉग्रेसचे असंख्य कार्यकर्ते उपस्थिती होती.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये