ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना राबविणार पुरोगामी शैक्षणिक सेवाव्रती उपक्रम

अनाथ विद्यार्थ्यांना देणार शैक्षणिक कीट - सामाजिक उपक्रमातून शैक्षणिक समृध्दी

चांदा ब्लास्ट

महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा कोल्हापूर यांनी शाळा शिकणा-या अनाथ विद्यार्थ्यांसाठी पुरोगामी शैक्षणिक पालकत्व् उपक्रम राबवित असून उत्त्म प्रतिसाद मिळत आहे.  सदर उपक्रम सामाजिक व विद्यार्थीहित जोपासणारे असल्याने आपल्या चंद्रपूर जिल्हयात हा उपक्रम राबविण्यात यावा .त्यासाठी पुरोगामी सभासदांनी आपल्या किंवा कुटुंबातील अथवा नातेवाईकांचे वाढदिवसानिमीत्त् रुपये ५००/- किंवा ५००/- च्या पटीत देणगी देवून या सामाजिक चळवळीसाठी हातभार लावावेत असे संघटनेच्या जिल्हा सभेत राज्यनेते विजय भोगेकर, राज्यसरचिटणीस हरीश ससनकर,जिल्हाध्यक्ष किशोर आनंदवार, यांनी व्यक्त् केले.
महा.पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना जिल्हा चंद्रपूर जिल्हा सभा नुकतीच जनता शिक्षण महाविद्यालय चंद्रपूर यंथे संपन्न् झाली. या सभेत चंद्रपूर जिल्हयातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत असलेल्या अनाथ निराधार  विद्यार्थ्यांना पुरोगामी शैक्षणिक सेवाव्रती उपक्रमांतर्गत शैक्षणिक कीट (दप्त्र,पुस्तके,नोटबुक) वाटप करण्यात येईल असा टराव घेण्यात आलेला आहे. यासाठी संघटनेचे सभासद यांनी आपल्या अथवा कुटूंबातील सदस्यांचे किंवा नातेवाईकांचे वाढदिवसानिमीत्त् संघटनेला देणगी देवून सदर उपक्रम राबविण्यासाठी मदत करण्याचे ठरविले आहे.
शैक्षणिक कार्यासोबत सामाजिक दायित्व् म्हणुन अनाथ निराधार विद्यार्थ्यांना शालेय दप्त्र पुस्तके,नोटबुक देवुन सहकार्य करणे हया उदात्त् हेतुने संघटनेचे हा उपक्रम राबविण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे. अनाथ निराधार मुलांना शिक्षणाची आवड असते परंतु त्यांना शिकण्यासाठी गरेजेचे असलेले साहित्यअभावी  ते शिक्षण घेवु  शकत नाही . त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी संघटनेचे हे एक छोटेसे पाउुल उचललेले आहे. या सामाजिक उपक्रमाला सर्वांनी सहकार्य करुन सामाजिक हातभार लावावा असे जिल्हा सरचिटणीस सुरेश गिलोरकर यांनी आवाहन केले आहे.असे जिल्हा प्रसिदधीप्रमुख लक्ष्म्ण खोब्रागडे यांनी कळविले आहे.
तसेच जि.प.प्रा.शिक्षक सहकारी पतसंस्था चिमुर चे नवनिर्वाचित संचालक व गोंडपिपरी पतसंस्थेच नवनिर्वाचित संचालक रत्नाकर चौधरी व टिम चे शाल श्रीफळ व डायरी देवून सत्कार करण्यात आले.
जिल्हा सभेला राज्यनेते विजय भोगेकर, राज्यसरचिटणीस हरीश ससनकर,जिल्हानेते नारायण कांबळे ,जिल्हा सल्लागार दिपक व-हेकर, जिल्हाध्यक्ष किशोर आनंदवार, सुरेश गिलोरकर,सुनिल कोहपरे, गंगाधर बोढे, विद्या खटी, पुनम सोरते, जीवन भोयर, लोमेश येलमुले,राजु चौधरी, मनोज बेले व  सर्व तालुका शाखेचे पदाधिकारी उपस्थित होते.
शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये