Sudarshan Nimkar
गुन्हेग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पुलगाव पोलीसांकडून गावठी हातभट्टीवर कारवाई

एकूण 72 हजारावर मुद्देमाल नाश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

सविस्तर याप्रमाणे आहे कि, दि. 28/07/2023 रोजी मुखबीरचे खात्रीशीर खबरेवरून आम्ही पो.नी राजपूत साहेब यांचे मार्गदर्शनात पो.हवा./11 चंद्रशेखर चुटे, पो.ना./1257 अमोल जिंदे, पो.ना./784 उमंग मसराम यांनी मौजा बाबुळगाव बोबडे शिवारात वर्धा नदीचे लगत रनिंग भट्टीवर कार्यवाही करण्यात आली. कार्यवाही दरम्यान एकुण. 800 ली. मोहा सडवा, 120ली. मोहा दारू, 02 जर्मन घमेले व भट्टी साहित्य असा. जु.कि. 72, 200 रू. चा मुद्देमाल मिळून आला. असून, सदरच्या भट्टीवरील आरोपीस पोलीस आल्याची चाहूल लागताच मोक्यावरून पसार झाला, जागीचं मोक्का जप्ती पंचनामा कार्यवाही करून घटनास्थळा वरून1) 07 प्लास्टीक मोठया ड्रममध्ये अंदाजे 700 ली. कच्चा मोहा सडवा रसायण, प्रति लीटर 50 रु प्रमाने 35000/- रु,2) 07 ड्रम किं. 7000 रू.3) 02 लोखंडी ड्रम मध्ये 100 लिटर उकळत मोहा सडवा रसायन प्रती ली. 50 रू. प्रमाणे एकुण कि. 5,000 रू.4) 02 लोखंडी किं.2000/- रु. 5) 03 प्लास्टिक कॅन मध्ये 120 लिटर गावठी मोहा दारू प्रति लिटर 100/- रु. प्रमाणे किंमत 12000/-6) 03 प्लास्टिक कॅन की. 900/- 7) 02 जर्मन घमिले की. 800/- रु  8) इतर भट्टी साठी लागणारे साहित्य की. 9,500/-रू. असा एकुण 72,200 रू. चा मुद्देमाल जप्त करून, जागीचं नाश करण्यात आला. आरोपी सूरज मधुकर बगाडे, रा. बाभूळगाव बोबडे विरूध्द पो.स्टे. पुलगाव येथे महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (बी,सी,ई,एफ) अन्वये कार्यवाही करण्यात आली.

सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक मा. श्री. नुरूल हसन सा., अपर पोलीस अधीक्षक मा. श्री. डाॅ सागर कवडे सा., उपविभागीय पोलीस अधिकारी सा. मा. श्री. संजय पवार यांचे मार्गदर्शनात पोलीस स्टेशन पुलगावचे ठाणेदार पो.नि. मा. श्री. डी. डी. राजपूत सा. यांचे निर्देशाप्रमाणे,पो.हवा./11 चंद्रशेखर चुटे, पो.ना./1257 अमोल जिंदे, पो.ना./784 उमंग मसराम यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये