ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रसन्मान कर्तव्याचा

वर्धा पोलीस अधि.व कर्म.कलाकार मंचातर्फे गाण्यांचा रंगारंग कार्यक्रम

मोहम्मद रफी यांच्या 43 व्या स्मृतीदिनानिमित्त आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

स्वर्गीय. मोहम्मद रफी यांना आपल्या मधून निघून गेले या गोष्टीला संपूर्ण 43 वर्ष पूर्ण झालेले आहेत तरी त्यांच्या गाण्याच्या आठवणी आपल्याला जाग्या करतात. यानिमित्ताने दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था सांवगी मेघे वर्धा व पोलिस अधिकारी आणि कर्मचारी कलाकार रफी मंच यांच्या संयुक्त विद्यमाने मोहम्मद रफी यादे सदाबहार गाण्याच्या यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी गायनाच्या लाइव्ह कार्यक्रम दिनांक 30 जुलै 2023 रोज रविवार सायंकाळी 6.30 वाजता दरम्यान दत्ता मेघे सभागृह सांवगी मेघे वर्धा येथे आयोजित करण्यात आलेला आहे कार्यक्रमाचे उद्घाटन वर्धा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री राहुल कर्डिले पोलिस अधीक्षक श्री नुरुल हसन वर्धा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ रोहन घुगे यांच्या सोबत असलेले प्रमुख पाहुणे म्हणूनडॉ अभ्युदय मेघे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाहिद कुरेशी हे करतील आणि अधिकारी व कर्मचारी विजय महेशगौरी भुषण सावरकर रितेश गुजर किशोर शेन्द्रे थेंबसिंग कोहचळे अनिल जाधव किशोर पाटील अश्विन सुखदेवे अनिता ढोबळे योगिता मसराम (झाडे) म्युझिकल बॅन्ड रवि ढोबळे यांचा समावेश करण्यात आलेला आहे हा कार्यक्रम घेण्याच्या मागचे कारण असे की कर्मचारी गण आपल्या कामामध्ये इतके व्यस्त असतात की आपल्या परिवारातील सदस्याकडे दुर्लक्ष होत असते करीता आपल्यावर असलेल्या ताणतणाव कमी करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे

तरी या कार्यक्रमाची सेवा निःशुल्क असून संगीत प्रेमीनी आणि नागरिकांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा आणि कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी विनंती अधिकारी व कर्मचारी रफी मंच यांच्या तर्फे करण्यात आली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये