ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

“गांजा वनस्पतीची लागवड करणाऱ्या गुन्हेगारावर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कार्यवाही”

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

  वर्धा पोलीस अधीक्षक मा. श्री. सौरभ कुमार अग्रवाल यांनी अंमली पदार्थ बाळगणारे व विक्री करणारे गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याचे स्थानिक गुन्हे शाखेस आदेशीत केल्याने, त्या अनुषंगाने अंमली पदार्थांची विक्री करणा-या गुन्हेगारांवर कारवाई करण्याची स्थानिक गुन्हे शाखेने धडक मोहिम राबविली असुन, दि. 15 मे 2026 रोजी स्था.गु.शा. वर्धा चे पथकास मुखबीरतर्फे मिळालेल्या खात्रीशीर खबरेवरून पो स्टे दहेगाव परिसरातील मौजा हमदापुर येथे प्रफुल तुळसीराम शंभरकर याचे राहते घरी एन.डि.पी.एस. कायद्यान्वये रेड केला असता, तेथे आरोपीने त्याचे राहते घराचे वॉल कंपाऊंड लगत, शासनाची कोणतीही परवानगी न घेता, त्याचे स्वतःचे आर्थिक फायद्याकरीता गांजा वनस्पती चे एकुण 05 फुट उंचीचे दोन झाडाची लागवड केल्याने, जागीचं जप्ती पंचनामा कार्यवाही करून, दोन्ही झाडाची पाने, फाद्या व मुळासह छाटणी करून त्याचे वजनमाप करून आरोपीचे ताब्यातुन एकुण निव्वळ वजन 04 किलो 92 ग्रॅम गांजा वनस्पती जु.कि. 81,840 रू चा मुद्देमाल जप्त करून, आरोपीविरूध्द पो.स्टे. दहेगाव येथे एन.डि.पी.एस. कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

  सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक श्री. सदाशिव वाघमारे, यांचे निर्देशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा जि. वर्धा चे पोलीस निरीक्षक श्री. विनोद चौधरी, पो.उपनि. सलाम कुरेशी, पो.अं अरविंद येनुरकर, रोशन निंबोळकर, रवि पुरोहित, अभिषेक नाईक सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये