पोलिस स्टेशन वर्धा शहर यांनी चारचाकी वाहनांचा पाठलाग करुन 12 लाख 95 हजारावर गाडीसह दारूसाठा केला जप्त
दारूविक्री करणारे चारचाकी वाहनांतील आरोपी पसार ; पोलिस स्टेशन वर्धा शहर यांनी केलेलीं मोठी कार्यवाही

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
दि. 15/05/2026 रोजी पोलिस स्टेशन वर्धा शहर पेट्रोलींग करत असताना पोलिस उपनिरीक्षक उमेश उगले यांना गुप्तचर व्दारे माहिती मिळाली की चारचाकी वाहन क्रमांक एम एच -12-डब्लू यु -3133 वाहनांमध्ये देशी विदेशी दारूसाठा विक्री करीता या मार्गाने येत आहे अशी माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक उमेश उगले पोलिस शिपाई अनिल चव्हाण आकाश कुंभरे पंकज भरणे लोभेश गाडवे यांनी पाठलाग करून कारागृह वर्धा येथे थांबवायचा प्रयत्न केला असताना येथे चारचाकी वाहन थांबले असून तेथून ते पसार झाले त्यांच्या पाठलाग करत असताना त्यांनी समृद्धी महामार्गावर आमगाव पर्यंत पाठलाग केला असताना येथे चारचाकी वाहन सोडून पसार झाले चारचाकी वाहनांची तपासणी करण्यात आली त्यावेळी चारचाकी वाहनांमध्ये RS च्या 16 पेट्या किंमत 30,7,200/- रुपये OC च्या 19 पेट्या किंमत 2,73,600/- रुपये IB च्या 19 पेट्या किंमत 14,400/- रुपये व चारचाकी वाहनांची किंमत 7,00,000/- रुपये सर्व मुद्देमाल 12,95,200/- रुपये एकुण चारचाकी वाहनांसोबत विदेशी दारूसाठा जप्त करण्यात आला आणि अज्ञात आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन वर्धा शहर येथे अपराध क्रमांक 607/26 कलम 65(A)(E),77(A)98, मोटार वाहन कायदा 145,183,184 असे गुन्हे दाखल करण्यात आले आहे आणि अज्ञात आरोपींचा शोध सुरू आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल वर्धा अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे वर्धा प्रमोद मकेश्वर उपविभागीय पोलिस अधिकारी वर्धा यांच्या मार्गदर्शनाखाली संतोष ताले पोलिस निरीक्षक पोलिस स्टेशन वर्धा शहर यांच्या नेतृत्वाखाली उमेश उगले पोलिस उपनिरीक्षक पोलिस स्टेशन वर्धा शहर अनिल चव्हाण पोलिस शिपाई आकाश कुंभरे पोलिस शिपाई पंकज भरणे पोलिस हवालदार लोभेश गाडवे यांनी केलेली आहे.



