ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

देऊळगाव राजा येथे विवाह सोहळ्यात चोरीचा प्रयत्न उधळला

दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा: : तालुक्यातील असोला फाटा परिसरातील शुभांगी लॉन्स येथे सुरू असलेल्या लग्नसमारंभात महिलेची बॅग चोरी करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. चोरीचा प्रयत्न उधळून लावताना उपस्थितांनी आरोपींना पकडण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी चाकूचा धाक दाखवत “जिवे मारून टाकू” अशी धमकी दिल्याने कार्यक्रमस्थळी एकच खळबळ उडाली.

या प्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात दोन आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राजू साहेबराव जाधव (वय ३७, रा. खापरखुटी खामगाव, ता. सिंदखेड राजा) यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी हिरासींग मोहनसींग बावरे व संतोष बापू शिंदे, दोघेही रा. देऊळगाव राजा, यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

१४ मे २०२६ रोजी मध्यरात्री सुमारे १२.२३ वाजताच्या दरम्यान शुभांगी लॉन्स, असोला फाटा येथे लग्नसमारंभ सुरू असताना आरोपींनी संगनमत करून एका महिलेची बॅग चोरी करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. यावेळी उपस्थित नागरिकांनी आरोपींना पकडण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी चाकू काढून धमकावत “एखाद्याला जिवे मारून टाकू” अशी धमकी दिली, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.

या प्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात कायम अप क्रमांक २०९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३०३(२), ६२, ३५१(२), ३५१(३) व ३(५) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सदर गुन्ह्याची नोंद पोहेकॉ गवई यांनी केली असून पुढील तपास पोहेकाे कुटे यांच्या मार्गदर्शनाखाली सुqरू आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये