ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेच्या वतीने दिवं. डॉ. कुंभारे यांना श्रद्धांजली अर्पण 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

   गडचिरोली जिल्ह्यातील थोर समाजसेवी व्यक्तीमत्व तथा अ. भा. श्री गुरुदेव सेवा मंडळाचे माजी जिल्हा सेवाधिकारी – कर्मयोगी डॉ . शिवनाथजी कुंभारे यांचे वृद्धापकाळाने गडचिरोली येथे दुःखद निधन झाले. त्यांच्या अस्थींचे विसर्जन श्रीक्षेत्र गुरूकुंज आश्रमातील पवित्र सर्व तिर्थ अस्थी कुंडात करण्यात आले.

त्यांना राष्ट्रसंत विचार साहित्य परिषद केंद्रीय समिती च्या वतीने आँनलाईन पध्दतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या श्रद्धांजली सभेच्या अध्यक्षस्थानी ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर होते. प्रथमत: परिषदेचे सरचिटणीस एड. राजेंद्र जेनेकर यांनी डॉ. कुंभारे यांच्या कार्यजीवनाचा परिचय करून दिला तर राजुरा तालुका सेवाधिकारी लटारू मत्ते आणि देवराव कोंडेकर (उर्जानगर) यांनी डॉ. कुंभारे यांनी आजवर केलेले विविधांगी सामाजिक कार्य संदर्भात माहिती दिली.

राजुरा तालुका प्रचार प्रमुख पांडुरंग शेंडे(देवाडा),विलास चौधरी (पेंढरी)यांनी डॉ. कुंभारे यांच्याबाबतच्या आठवणी सांगत शोक संवेदना प्रकट केल्यात. शंकर दरेकर (उर्जानगर), मुरलीधर गोहणे, नामदेव आस्वले (उर्जाग्राम), पत्रकार उदय धकाते, मनोहर हेपट (गडचिरोली), संजय वैद्य,विश्वास सुर आदींनी डॉ.कुंभारे यांच्या सेवा कार्याचा गौरव करून आपल्या दुःखद शोकसंवेदना व्यक्त केल्यात.

योगतज्ञ विनायक साळवे, राजुरा तालुका प्रसिद्धीप्रमुख अविनाश ठाकरे, पिलाजी भोंगळे, वसा गावचे दहिकर पाटील आदींनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्यात. दिवं. डॉ. शिवनाथजी कुंभारे यांनी वैद्यकीय सेवेसोबतच राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचा प्रचार प्रसार आदिवासी व दुर्गम भागात करून उत्तम समाजमन निर्मितीसाठी झटले. राष्ट्रसेवेसाठी त्यांनी दिलेले योगदान पुढील पिढीला प्रेरणादायी ठरणार असल्याच्या शोक संवेदना बंडोपंत बोढेकर यांनी व्यक्त केल्यात. तंत्र सहाय्य आणि सूत्रसंचालन डॉ.श्रावण बानासुरे यांनी केले तर इंजि.विलास उगे यांनी आभार व्यक्त केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये