बोरडे-वाढई परिवारानी नियोजित वेळेत विवाह लावून जपला आदर्श
शिस्तबद्ध नियोजनामुळे विवाह सोहळ्याची सर्वत्र चर्चा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
सध्या विवाह सोहळ्यांमध्ये तासन्तास विलंब होणे, पाहुण्यांची गैरसोय आणि नियोजनाचा अभाव हे चित्र नेहमीच पाहायला मिळते. मात्र कोरपना येथील बोरडे परिवार आणि राजुरा तालुक्यातील कळमना येथील वाढई परिवाराने वेळेचे काटेकोर पालन करत विवाह सोहळा अगदी नियोजित मुहूर्तावर पार पाडून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. शिस्त, व्यवस्थापन आणि संस्कार यांचा सुंदर संगम असलेल्या या विवाह सोहळ्याची परिसरात विशेष चर्चा रंगली आहे.
कोरपना येथील श्रीमती कलावती बोरडे व स्वर्गीय प्राचार्य गजाननराव बोरडे यांचे चिरंजीव चि. प्रतीक बोरडे (नायब तहसीलदार) यांचा विवाह कळमना (ता. राजुरा) येथील साधनाताई व पद्माकरजी वाढई सर यांची सुकन्या चि. सौ. कां. आचल यांच्यासोबत १० मे रोजी राजुरा येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
या विवाह सोहळ्यास राजकीय, सामाजिक, शैक्षणिक तसेच प्रशासकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शविली. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक तथा माजी आमदार सुदर्शन निमकर व वर्षा निमकर यांनी विवाह अगदी मुहूर्तावर लावल्याबद्दल नवदाम्पत्याचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. त्यांनी बोरडे व वाढई परिवाराच्या वेळेच्या नियोजनाचे विशेष कौतुक करत नवदाम्पत्यास शुभाशीर्वाद दिले.
यावेळी नागपूर विभागाचे शिक्षक आमदार श्री सुधाकरराव अडबाले सर, राजुरा निर्वाचन क्षेत्र चे आमदार श्री देवरावदादा भोंगळे,चंद्रपूर क्षेत्रचे आमदार श्री किशोरभाऊ जोरगेवार,माजी आमदार श्री सुभाष धोटे, बाजार समितीचे उपसभापती संजय पावडे, विमाशीचे केशवराव ठाकरे सर जनसत्याग्रह संघटनेचे अध्यक्ष सय्यद आबिद अली तसेच आदर्श ग्राम कळमना येथील सरपंच नंदकिशोर वाढई यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विवाह सोहळ्यादरम्यान बोरडे व वाढई परिवाराच्या वतीने शिक्षक आमदार श्री सुधाकरराव अडबाले, राजुरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री देवरावदादा भोंगळे व चंद्रपूरचे आमदार श्री किशोरभाऊ जोरगेवार माजी आमदार सुदर्शनजी निमकर, सुभाषभाऊ धोटे यांचा सत्कार करण्यात आला . प्रसंगी श्री नितीनकुमार हिंगोले उपविभागीय अधिकारी वणी, श्री अर्जुन पावरा ऊपविभागीय अधिकारी बल्लारपूर, श्री राहुल मडावी पोलिस उप अधीक्षक गडचिरोली, श्री निखिल धूळधर तहसीलदार वणी, श्री किशोर गज्जलवार गटविकासअधिकारी वणी,श्री महेश रामगुंडे तहसीलदार तेल्हारा, श्री रवींद्र कापशीकर तहसीलदार बार्शी, अनिल देरकर पोलिस निरीक्षक वडसा, निलेश मालेकर विक्रीकर निरीक्षक यांच्यासह अनेक शासकिय अधिकारी व कर्मचारी यांनी उपस्थित राहून नवदाम्पत्यास शुभाशीर्वाद दिले.
या विवाह सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरले ते म्हणजे संपूर्ण कार्यक्रमाचे अचूक आणि शिस्तबद्ध नियोजन. वराचे भाऊजी तथा सेवानिवृत्त प्राचार्य संजय ठावरी यांनी विवाह वेळेत पार पडण्यासाठी विशेष मेहनत घेतली. त्यांच्या नियोजनामुळे सर्व धार्मिक विधी नियोजित वेळेनुसार पार पडले. उपस्थितांनीही या वेळपालनाचे आणि उत्कृष्ट व्यवस्थापनाचे मनापासून कौतुक केले.
हजारो आप्तस्वकीय, विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलेला हा विवाह सोहळा केवळ कौटुंबिक कार्यक्रम न राहता “वेळेचे व्यवस्थापन आणि संस्कारांचा आदर्श” म्हणून परिसरात चर्चेचा विषय ठरला. कार्यक्रमाचे प्रभावी व नेटके संचालन राष्ट्रसंताच्या ओवीचा दाखला देत अविनाश पिंपळकर सर वरोरा यांनी केले.



