सेवानिवृत्त कर्मचारी संघटनाच्या वतीने सुभाषचंद्र बोस व बाजीराव पेशवे यांना अभिवादन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
आझाद हिंद सेनेचे संस्थापक सुभाषचंद्र बोस यांची पुण्यतिथी व बाजीराव पेशवे यांची जयंती देऊळगाव राजा तालुका सेवा निवृत्त कर्मचारी संघटना देऊळगाव राजा , सहकार महर्षी भास्करराव शिंगणे सार्वजनिक वाचनालय देऊळगाव राजा, जनसेवा सामाजिक संघटना व जेष्ठ नागरिक संघटना यांच्या वतीने विरंगुळा भवन येथे आज साजरी करण्यात आली, यावेळी शहरातील सुप्रसिद्ध डॉक्टर, साहित्यिक, गायक व कवी डॉ.भगवानराव खरात यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला,देऊळगाव राजा तालुका सेवा निवृत्त कर्मचारी संघटना देऊळगाव राजाचे वतीने अध्यक्ष श्री बळीराम मापारी यांचे हस्ते शाल, पुष्पगुच्छ व मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त कर्मचारी संघटना चे अध्यक्ष बळीराम मापारी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री शिवाजी महाराज कनिष्ठ महाविद्यालय देऊळगाव राजाचे प्राचार्य संजय देशमुख, व्यंकटेश महाविद्यालय देऊळगाव राजा येथील प्रा. डॉ. मधुकर जाधव, रमेश डोईफोडे होते, यावेळी प्रकाश अहिरे, गोविंदराव अहिरे,रमेश नरोडे,प्रा.अशोक डोईफोडे,प्रा.विजय रायमल,प्रा.विनायक कुळकर्णी, सतिश कुळकर्णी, मधुकरराव धुळे,अरुण सपाटे,अरुण खरात, प्रदीप मेडिकल चे संचालक वाघ, उप कृषी अधिकारी अनंत देशमुख,,शांतिलाल निरफळे, पंडितराव पाथरकर,आशाताई शेळके, कैलासराव शेळके, मार्तंड आप्पा घिके, रामदास कुलथे,सुशिल हनुमंते, किशोर कुंभारे आदी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी सुभाषचंद्र बोस व बाजीराव पेशवे यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला तसेच सत्कारमूर्ती डॉ भगवानराव खरात यांच्या अष्टपैलू व्यक्तीमत्वावर प्रकाश टाकला,कार्यक्रमाचे संचलन संघटनेचे संघटक प्रकाश अहिरे यांनी केले तर आभार प्रदर्शन संघटनेचे सचिव गोविंद बोरकर यांनी केले.कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगिताने करण्यात आली.



