रिधोरा शिवारात वाघाने पाडला पाळीव गाईचा फडसा
वनविभागाकडे होत आहे शेती संरक्षणनाची मागणी
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
मौजा रिधोरा येथील नामे.. भीमराव झिंगुजी खैरकर सर्वे नंबर 16/1 यांच्या मालकी च्या शेतातील गोठ्यातून गेल्या 11/5/2026च्या रात्री ला वाघाने गाईवर हमाला करुन तिला मारल्याची घटना घडली ही त्यांचे पालतू जनावर खाण्याची घटना त्यांच्या शेतात या पूर्वी सुद्धा घडली होती. वनविभागास या घटनेची माहिती मिळताच सहवन क्षेत्राचे क्षेत्र सहाय्यक श्री. एस. आर कोटजावरे व रिधोरा बिटचे वनरक्षक श्री. ए. एम. ढाले यांनी घटनास्थळावर पोहचून सदर मृत पशुधनाचा मौका पंचनामा नोंदविला व शासकीय नियमाप्रमाणे सदर मृत पशुधनाचे नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळवून देण्याचे पशुधन मालक भीमराव जी खैरकर यांना आश्वासन दिले.भीमराव जी खैरकर यांची कुटुंब चे उपजीविका या दुधाळ जनावरच आणी शेती वर असल्यामुळे त्यांनी शासनाला शेता साठी कुंपण आणी प्रकाशासाठी सोलर लाईट ची वेवस्था करुन द्यावी अशी मागणी या वेळेस केली
या वाघाच्या नेहमी होणाऱ्या हल्या मुळे शेतकऱ्यांनी वनविभाग आणी शासन स्तरावरून शेतीसाठी कंपाउंड व पाळीव जाणवरांसाठी गोठ्याची वेवस्था करुन देण्याची मागणी करण्यात आली.



